व्हायरस चीनची पाठ सोडेना! कोरोनानंतर ‘या’ नव्या व्हायरसची एन्ट्री!

दोन रूग्ण आढळल्याने चीनला इशाला

corona virus

कोरोनानंतर आता चीनमध्ये आणखी एक प्राणघातक व्हायरस पसरण्याचा धोका वाढू लागला आहे. उत्तर चीनमध्ये रविवारी ब्यूबॉनिक प्लेग पसरण्याचा संशय व्यक्त केल्यानंतर चीनला इशारा देण्यात आला आहे. येथील सरकारी माध्यमांनी ही माहिती दिली. गव्हर्नमेंट पीपल्स डेली ऑनलाईनच्या वृत्तानुसार, बयन्नुर, इनर मंगोलियन स्वायत्त प्रदेश, प्लेगच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी तिसर्‍या टप्प्यातील इशारा दिला आहे.

शनिवारी बयन्नुर येथील रूग्णालयात ब्यूबॉनिक प्लेगचा संशयित प्रकार उघडकीस आला. यानंतर स्थानिक आरोग्य प्राधिकरणाने दिलेल्या घोषणेनुसार ब्यूबॉनिक प्लेगचा वाढणारा धोका लक्षात घेता २०२० वर्षाअखेर पर्यंत हा इशारा कायम राहील. स्थानिक आरोग्य प्राधिकरणाने सांगितले की, ‘शहरात सध्या मानवी प्लेगच्या साथीचा धोका आहे. लोकांनी आत्म-संरक्षणासाठी जागरूकता आणि क्षमता वाढविली पाहिजे.तसेच आरोग्यासंदर्भात असामान्य स्थितीबद्दल काही तक्रार जाणवल्यास त्वरित माहिती द्यावी.


व्हायरस चीनला सोडेना; आता सापडला नवा विषाणू!

अधिकृत शिन्हुआ या वृत्तसंस्थेने १ जुलै रोजी सांगितले की, पश्चिम मंगोलियाच्या खोड प्रांतात बुबोनिक प्लेगची दोन संशयित प्रकरणे आढळली असून प्रयोगशाळेच्या केलेल्या तपासणीत या नव्या व्हायरसची माहिती समोर आली आहे.

तसेच, काही दिवसांपुर्वी चीनमध्ये स्वाइन फ्लूचा एक नवीन प्रकार आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. अमेरिकन सायन्स जर्नल पीएनएएसमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधकांच्या अहवालानुसार, नवीन स्वाइन फ्लू हा २००९ मध्ये जगभरात पसरलेल्या H1N1 स्वाइन फ्लूचा अनुवांशिक वंशज आहे, परंतु तो अधिक धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.

असे नाव आहे या नव्या फ्लूचे..

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना साथीच्या काळात जर स्वाइन फ्लूचे नवीन संक्रमण पसरले तर लवकरच जगाला आणखी एका समस्येला सामोरे जावे लागेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. या नवीन स्वाइन फ्लूला जी ४ असे नाव देण्यात आले आहे. ते शोधण्यासाठी चिनी शास्त्रज्ञांनी २०११ ते २०१८ पर्यंत संशोधन केले आहे. वृत्तानुसार, या काळात शास्त्रज्ञांनी चीनच्या १० राज्यांतील ३० हजार डुकरांच्या नाकातून एक स्वॅब घेतले.