घरताज्या घडामोडीAfghanistan: अफगाणिस्तानमधील २०० लाख कोटींच्या नैसर्गिक खनिजांवर चीनचा डोळा

Afghanistan: अफगाणिस्तानमधील २०० लाख कोटींच्या नैसर्गिक खनिजांवर चीनचा डोळा

Subscribe

तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर कब्जा करून दोन आठवड्यांहून अधिक काळ उलटून गेला आहे. पण अजूनही अफगाणिस्तानमधील पंजशीरमध्ये तालिबान्यांना ताबा मिळवता आला नाही आहे. त्यामुळे सतत तालिबानी पंजशीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे लवकरच अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार स्थापन करणार आहे. याचा फायदा चीन उचलताना दिसत आहे. आता अफगाणिस्तानमधील नैसर्गिक खनिजांवर चीनचा डोळा आहे. त्यामुळे तालिबान्यांना चीन पाठिंबा देताना दिसत आहे.

अफगाणिस्तानमधील संघर्षमय परिस्थितीदरम्यान चीन कावेबाजपणा करताना दिसत आहे. अफगाणिस्तानच्या भूमीखाली २०० लाख कोटी रुपयांचे खनिज दडले आहेत. या खनिजांमध्ये लिथियमचे प्रमाण सर्वाधिक आहे. याच दुर्मिळ खनिजांवर चीनचा डोळा असून हे खनिज बळकावून जागतिक बाजारपेठ आपली मुठीत ठेवण्याचा चीनचा हेतू आहे.

- Advertisement -

अफगाणिस्तानमध्ये या व्यतिरिक्त तांबे, सोने, नैसर्गिक वायू, कोळसा, हिरे, सल्फर, जिप्सम, लोखंड, बॉक्साइट या नैसर्गिक खनिजांनाचा विपुल साठा आहे. यामुळेच चीनने तालिबानसोबत मैत्रीचे संबंध तयार करण्यासाठी हात पुढे केला आहे. अफगाणिस्तानच्या भूमीखाली असलेल्या नैसर्गिक खनिजांवर चीनला कब्जा करायचा आहे. तसेच चीनला बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह योजनेमुळेही चीनला अफगाणिस्तानचा फायदा होणार आहे. यामुळे पेशावर ते काबूल येथे पक्का रस्ता तयार करून चीन मध्य आशियात व्यापार करू शकणार आहे. त्यामुळे सध्या आपल्या फायद्यासाठी चीन सध्या तालिबान्यांना पाठिंबा देताना दिसत आहे.


हेही वाचा – Afghanistan: पंजशीरमध्ये ४० साथीदारांचे मृतदेह टाकून तालिबान्यांनी काढला पळ

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -