Bird flu in Human : नवं टेन्शन! चीनमध्ये चार वर्षांच्या मुलाला बर्ड फ्ल्यूची लागण

चीनमध्ये कोरोना विषाणाने मोठ्या प्रमाणात थैमान घातलं होतं. या विषाणूपासून चीन मुक्ती मिळवत असतानाच त्याच्या डोक्यावर आता बर्ड फ्ल्यू संकट ओढावत आहे. चीनच्या मध्य हेनान प्रांतातील एका ४ वर्षीय मुलाला बर्ड फ्लूच्या H3N8 या विषाणूची बाधा झाली आहे, अशी माहिती आरोग्य प्राधिकरणाने दिली आहे. परंतु लोकांमध्ये संसर्ग होण्याचा धोका कमी असल्याचे देखील सांगितले जात आहे.

५ एप्रिल रोजी मध्य हेनान प्रांतातील एका चार वर्षांच्या मुलाला ताप आणि इतर लक्षणे दिसू लागल्याने संसर्ग झाल्याचे आढळून आले. परंतु त्याच्या जवळ आलेली कोणत्याही व्यक्तीला हा संसर्ग न झाल्याचे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे. मुलगा घरात पाळण्यात आलेल्या कोंबड्या आणि कावळ्यांच्या संपर्कात होता, असं आरोग्य आयोगाने म्हटले आहे.

एनएचसीने सांगितले की, H3N8 हा प्रकार यापूर्वीही घोडे, कुत्रे आणि पक्ष्यांमध्ये आढळून आला आहे. परंतु H3N8 चे कोणतेही मानवी प्रकरण नोंदवले गेले नाहीयेत. चीनमध्ये बर्ड फ्लूचे अनेक स्ट्रेन आहेत. त्यातील काही स्ट्रेनची व्यक्तींनाही बाधा झाली आहे. पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तिंना बर्ड फ्लूच्या स्ट्रेनची बाधा होण्याची शक्यता अधिक असते. H3N8 स्ट्रेन हा जगातील इतर कोणत्याही देशांतील व्यक्तींमध्ये आढळलेला नाहीये.

H3N8 या स्ट्रेननंतर H10N3 स्ट्रेन अधिक शक्तिशाली नाही, शिवाय त्याचा धोकाही कमी आहे. एनएचसीने सांगितले की, या विषाणूच्या स्ट्रेनमुळे फारसा धोकाही संभवत नाही. त्याशिवाय या विषाणूचा स्ट्रेन मोठ्या प्रमाणावर फैलावण्याचा धोकाही कमी असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा : Mumbai Local Train: लोकल ट्रेनमधून पडलेल्या ८० वर्षीय वृद्धाला नुकसान भरपाई देण्याबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय