घरCORONA UPDATEचीनच्या सीफूड मार्केटमधून आला कोरोना; लोकांना मासे न खाण्याचा दिला सल्ला

चीनच्या सीफूड मार्केटमधून आला कोरोना; लोकांना मासे न खाण्याचा दिला सल्ला

Subscribe

चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूचा पुन्हा एकदा चीनमध्ये संसर्ग सुरू झाला आहे. चीनच्या बीजिंगमधील होलसेल सीफूड मार्केटमध्ये मांसाहार आणि समुद्रातील प्राण्यांचे सेवन करणाऱ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. याचे कारण या परिसरातील कमी तापमान आणि उच्च आर्द्रता हे सांगितले जात आहे. गेल्या आठवड्यात चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर याची तपासणी केली असता हा अहवाल समोर आला. यात शिनफादी फूड सेंटरशी संबंधीत कोरोना रुग्ण असल्याचे सांगितले गेले. या फूड सेंटरमध्ये वेअर हाऊस आणि ट्रेडिंग हॉल असून याचा आकार १६० फुटबॉल मैदानाच्या आकारसमान आहे.

या परिसरातून नुकतेच १०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाने डोके वर काढल्याचे बोलले जात आहे. या सीफूड मार्केटमध्ये विविध प्रकारच्या मांसाहाराची विक्री केली जाते. समुद्री प्राणांसह बीफ आणि मटणदेखील विक्रीसाठी ठेवले जातात.

- Advertisement -

हेही वाचा –

मोनोरेलसाठी चिनी कंपन्यांच्या आलेल्या निविदा MMRDA ने केल्या रद्द!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -