घरदेश-विदेशChina Fire Incidents : रुग्णालय आणि कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत 32 जणांचा मृत्यू

China Fire Incidents : रुग्णालय आणि कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत 32 जणांचा मृत्यू

Subscribe

नवी दिल्ली : चीनमधील रुग्णालय आणि कारखान्यात मंगळवारी भीषण आगीच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती चिनी माध्यमांनी दिली आहे. माध्यमातील वुत्तानुसार बीजिंगच्या फेंगताई जिल्ह्यातील एका रुग्णालयाला, तर जिन्हुआ शहरातील वुई काउंटीमधील एका कारखान्याला आग लागली आहे. (Hospitals and factories in China have witnessed massive fire incidents on Tuesday).

71 रुग्णांना रुग्णालयातून बाहेर काढले
माध्यमातील वुत्तानुसार बीजिंगच्या फेंगताई जिल्ह्यातील एका रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या इमारतीला आज (18 एप्रिल) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) आग लागली (Timber fire at the entrance of a hospital in Fengtai District, Beijing) आणि त्यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. अर्ध्या तासात या आगीवर नियत्रंण मिळवण्यात आले आहे. दुपारी साडेतील वाजेपर्यंत बचावकार्य सुरू होते. या आगीतून एकूण 71 रुग्णांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आग का लागली याचे कारण अद्याप समजले नाही, असे अग्निशमन दलाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

- Advertisement -

 कारखान्याच्या आगीत 11 जणांचा मृत्यू
चीनच्या पूर्व झेजियांग प्रांतातील जिन्हुआ शहरातील वुई काउंटीमधील एका कारखान्याला सोमवारी (17 एप्रिल) पहाटे 2 वाजता आग लागली. या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस अधिकारी आणि आपत्कालीन वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. चायना डेली या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आग आटोक्यात आल्यानंतर मंगळवारी (18 एप्रिल) पहाटे 4 वाजेपर्यंत शोध आणि बचाव कार्य सुरू होते. या घटनेप्रकरणी कारखान्यातील जबाबदार व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा – विमानाच्या विंडशील्डला क्रॅक अन् वैमानिकाने दाखवले प्रसंगावधान; थोडक्यात अनर्थ टळला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -