घरदेश-विदेशचीनमध्ये बुलडोझरच्या साहाय्याने होत आहे पूरग्रस्तांची सुटका

चीनमध्ये बुलडोझरच्या साहाय्याने होत आहे पूरग्रस्तांची सुटका

Subscribe

लाखो लोकांचे आत्तापर्यंत स्थलांतर करण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

महाराष्ट्रात जून महिन्यापासूनच मान्सूनला सुरुवात झाली असून गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाल्याने घरे वाहून गेल्याची तसेच दरड कोसळल्याची माहिती समोर येत आहे. तसेच महाराष्ट्रातचं नाही तर यंदा अनेक देशांवर पावसाचा कहर बरसला आहे. युरोप,अमेरीका, आशिया या तीनही खंडात पावसाने रौद्र रुप धारण केल्याचे चित्र समोर दिसत आहे. अशातच आता चीन मधील लोकांना पावसाचा प्रकोप सहन करावा लागत आहे. चीन मधील हेनान प्रांतात निसर्गाचा कोप झाला असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. लोकांची घरे वाहून गेली आहेत. तसेच मेट्रोमध्ये देखील पाणी घूसले आहे. लोकांच्या मदतीकरीता चक्क बुलडोजरचा वापर केला जात असल्याचे दिसतेय. माहितीनूसार मुसळाधार पावसामुळे 25 लोकांचा मृत्यूची नोंद आत्तापर्यंत करण्यात आली आहे. दरवर्षी कोसळणाऱ्या पावसाच्या तुलनेत हेनान मधील झेंगझोऊमध्ये गेल्या चार दिवसापासू पावसाची दमदार बॅटींग सूरु आहे. यामुळे लोकामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याकरीता बुलडोजरचा वापर करावा लागत आहे.

व्हिडिओ पाहा-

- Advertisement -

लाखो लोकांचे आत्तापर्यंत स्थलांतर करण्यात बचाव पथकाला यश आले आहे. चीनमध्ये आलेल्या या संकटाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांची घरे पुर्णपणे पाण्याखाली गेली असून प्रचंड आर्थिक नूकसान झाले आहे.


हे हि वाचा – जगातील सर्वाधिक भारतीयांसोबत झाली सायबर फसवणूक; मायक्रोसॉफ्ट रिसर्च अहवालातून स्पष्ट

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -