ड्रॅगनची नवी चाल! तिबेटनंतर भूतानच्या जमिनीवर चीनची कुरघोडी, भारताच्या सीमेवर हालचाली वाढल्या

भूतानच्या १०० किमीपर्यंत असलेल्या जमिनीवर ड्रॅगनचा ताबा

भारत आणि चीनचा सीमावाद प्रश्न आता वाढत आहे. हिमाचल प्रदेशपासून ते अरूणाचल प्रदेशपर्यंत आणि तिबेटमध्ये चीनने कुरघोडी करण्यास सुरूवात केलीय. त्यानंतर आता भूतानच्या जमिनीवर चीन नवी खेळी करण्याचा प्रयत्न करतोय. भूतानच्या १०० किमीपर्यंत असलेल्या जमिनीवर ड्रॅगनने ताबा मिळवला आहे. तसेच भारताच्या सीमेवर हालचाली वाढल्या असून ४ गावं सुद्धा वसवली आहेत. एका रिपोर्टच्या माहितीनुसार, चीनने या जमिनीवर एक वर्षात गावं वसवली आहेत. ही गावं भारताच्या अगदी सीमेलगत आहेत. त्यामुळे भूतानच्या सोबतच भारताने देखील चिंता व्यक्त केली आहे. चीन सैनिकांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी एका सॅटेलाईट द्वारे काही फोटो कॅप्चर करण्यात आले आहेत.

एका ट्विटनुसार १०० किमीपर्यंतच्या गावामध्ये चीनने घुसखोरी केली आहे. तसेच डोकलामच्या जवळ असलेल्या भूतान आणि चीनच्या वादावर २०२०-२१ मध्ये निर्माण झालं होतं. यामध्ये काही नवीन गावं सुद्धा दिसत आहेत. २०१७ मध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला होता. त्यानंतरही चीनने नवी गावं बनवण्यास सुरूवात केली. भूतान भारताचा सर्वात जवळचा असल्यामुळे भारताची चिंता आता वाढत आहे. भारत भूतानच्या सैन्यांना सुद्दा ट्रेनिंग देत आहे. भूतानवर चीनचं सातत्याने दबाव वाढत आहे.

भूतानच्या सीमेवरून काहीतरी भागीदारी करण्यात यावी, असं चीनचं म्हणणं आहे. दोन्ही देशांमध्ये बोलणं देखील झालं आहे. द इंटेल लॅबच्या सूत्रानुसार, ही नवीन गावं २०२० आणि नोव्हेंबर २०२१ च्या मध्ये बनवण्यात आली होती. तसेच चीनने नवीन कायदा पास देखील केला आहे. चीनचं लक्ष संपूर्ण देश मुठीत करणं आहे. परंतु यामुळे इतर देशांवर त्याचा मोठा प्रभाव पडत आहे.

भारताने या कायद्यावर बोटं ठेवलं आहे. विदेश मंत्रालयचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलंय की, चीनने २३ ऑक्टोबरला भूमी सीमा कायदा जारी केला होता. यामध्ये त्यांनी सांगितलंय की, भूमि सीमेच्या कायद्यावर देखील प्रश्न उपस्थित होत होते. परंतु चीन जमिनीच्या सीमेबाबत इतर देशांसोबत केलेल्या किंवा संयुक्तपणे स्वीकारलेल्या करारांचे पालन करेल. असं बागची यांनी म्हटलं आहे.

हे एकीकडे सुरू असतानाच चीनने नवीन खेळी सुरू केली आहे. चीनी सैनिकांनी तिबेटमध्ये हैलिकॉप्टरचा ताफाच आणला असून त्यासाठी हेलीपोर्टही उभारण्यात येत आहे. हे हेलिपोर्ट एवढे मोठे आहे की शंभर लढाऊ हेलिकॉप्टर तेथे लपवून ठेवता येतात. यामुळे चीनी ड्रॅगनच्या प्रत्येक हालचालींवर भारतीय सैनिक नजर ठेऊन आहेत. तिबेटचे पठार सर्वात उंच असून ते डोंगर रांगांनी वेढलेलं आहे. चीन आपल्या हवाई मार्गाची दीशा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे सैनिकांना एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. तसेच आपात्कालीन परिस्थितीमध्ये सैनिकांना मदत पोहोचवली जाऊ शकते.

२०२० मध्ये चीनने आपल्या जे-२० हेलिकॉप्टरला तिबेटमध्ये तैनात केलं होतं. त्यामुळे सर्वात उंचीवर असलेल्या भागात मोहीम राबवणे सोपे झाले आहे. एवढेच नाही तर इतरही अनेक हेलिकॉप्टरला या भागात तैनात करण्यात आलंय. चीनने गोलमुडमध्ये एक सर्वात मोठं हेलीपोर्ट बांधल्याचं चित्र सॅटेलाईटच्या माध्यमातून समोर आलं आहे. येथे हेलिकॉप्टर्ससाठी ६३ हँगर्स दिसतात. याव्यतिरिक्त येथे अनेक इमारती देखील बांधण्यात आल्या आहेत. भारताच्या सीमेलगत असणाऱ्या भागांमध्ये चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. त्यामुळे भारत आणि चीनमधील तणाव वाढत आहे.


हेही वाचा: