घरताज्या घडामोडीचीनचा स्वार्थीपणा, 'करोना बाबत' जगाला अंधारात ठेवले

चीनचा स्वार्थीपणा, ‘करोना बाबत’ जगाला अंधारात ठेवले

Subscribe

जगापासून महत्वाच्या गोष्टी दडवून ठेवण्याच्या चीनच्या स्वार्थीवृत्तीमुळे जगावर करोना व्हायरस नावाचे मृत्यूचे संकट कोसळले आहे. आतापर्यंत यात एकट्या चीनमध्ये तीनशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो जणांना याची लागण झाली आहे. पण जर चीनने वेळीच करोना संसर्गाची माहिती जगाला दिली असती तर आज शेकडो नागरिकांचे नाहक बळी गेले नसते. अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.

जानेवारी महिन्यात करोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला असा दावा चीनने जगासमोर केला आहे. पण प्रत्यक्षात हा व्हायरस डिसेंबर किंवा त्याआधीपासूनच चीनमध्ये हातपाय पसरत होता. डिसेंबर महिन्यात वुहानमध्ये विचित्र आजाराने ग्रस्त असलेल्या सात जणांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्दी, खोकला, ताप, भयानक अंगदुखीने हे सातही रुग्ण बेहाल झाले होते. त्या सातही रुग्णांना वेगळ्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. वैद्यकिय विद्यार्थ्यांना त्या वार्डमध्ये जाण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. रुग्णांची अवस्था बघून हे काहीतरी वेगळ असल्याचा संशय रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टर ली वेनलियांग यांनी ३० डिसेंबरला एका वेबसाईटवर व्यक्त केला. त्यांची प्राथमिक लक्षणे पाहता २००२ साली चीनमध्ये ८०० जणांचा बळी घेतलेल्या SARS सार्स या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

- Advertisement -

पण हा व्हायरस सार्सपेक्षा भयानक असल्याचे वेनलियांग यांनी सांगितले . त्यानंतर वुहानच्या आरोग्य विभागाने वेनलियांग यांना गैरवर्तणुक केल्याचे समन बजावले. बघता बघता ही बातमी मिडियात पसरली. त्यानंतर वेनलियांग यांना मीडियाबरोबर बोलण्यास मनाई करण्यात आली. राजकीय दबाव त्यांच्यावर टाकण्यात आला. यादरम्यान, करोनाने वुहानबरोबरच आजूबाजूच्या छोट्या मोठ्या शहर व गावांमध्ये हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. रुग्णांच्या वैदकिय चाचण्या केल्या जात होत्या. पण त्यांना नक्की काय झाले आहे. याबद्दल रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अंधारात ठेवले गेले. शहरातील सुपर मार्केटस, सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली. जनतेने कारण विचारता डागडुजीचे कारणं देऊन त्यांची बोळवण करण्यात येत होती.

चीन सरकार आजाराचे गांभार्य जनतेपर्यंत, जगापर्यंत कसे पोहचणार नाही याची पुरेपूर दक्षता घेत होते. यामुळे जनता निश्चिंत होती. लोक कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये जा करत होते. या कालावधीत करोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला. करोनाग्रस्त रुग्ण दुसऱ्या ठिकाणी जाताना आपल्याबरोबर आजार घेऊनच फिरत होता. त्यामुळे एकट्या वुहान शहरातच करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. तरीही चीनने करोना व्हायरस चीनमध्ये आल्याचे जाहीर केले नाही. यामुळे कोणत्याही देशाने या व्हायरसला गांभीर्याने घेतले नाही.

- Advertisement -

एकीकडे करोना आक्राळ विक्राळ रुप धारण करत होता. पण चीनने देशांतर्गत राजकीय दबाव आणि आंतराष्ट्रीय आर्थिक फायद्यासाठी एवढे मोठे सत्य जगापासून लवपून ठेवले होते. अखेर करोनावर नियंत्रण ठेवणे अशक्य झाल्याने वुहान शहरात प्रवेश बंदी करण्यात आली. ही बाब मिडियासमोर आली. त्यानंतर नाईलाजाने चीनला करोना व्हायरस चीनमध्ये आल्याचे जाहीर करावे लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -