घरताज्या घडामोडीबीजिंगकडून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर निर्बंध

बीजिंगकडून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर निर्बंध

Subscribe

बीजिंगने अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शुक्रवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने माहिती दिली.

बीजिंगने अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शुक्रवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने माहिती दिली. तसेच, चीनच्या सरकारी मीडिया हाऊस CGTN ने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (china imposes sanctions on nancy pelosi and her immediate family memebers after her taiwan visit)

दरम्यान, पेलोसी त्यांच्या आशिया दौऱ्यादरम्यान तैवानच्या दौऱ्यावर होत्या. यावरून चीनने मोठा गदारोळ केला. शिवाय, चीन तैवानला स्वतःचा वेगळा प्रांत मानतो आणि वेळ आल्यावर या बेट देशाला स्वतःमध्ये विलीन करणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीला चीन आपल्या अंतर्गत बाबींमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप मानत आहे. तसेच, या कारणामुळे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग चांगलेच नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्याशिवाय, तैवान स्वतःला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून सादर करतो आणि चीनवर विस्तारवादी असल्याचा आरोप करतो.

जगातील बहुतेक मोठे देश प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तैवानच्या भूमिकेशी सहमत आहेत. त्यामुळे चीनच्या नाराजीत आणखी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे म्हणणे आहे की, शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीन व्लादिमीर पुतिनने जे केले ते तैवानशी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

- Advertisement -

तैवानमधून नॅन्सी पेलोसीच्या बाहेर पडल्यानंतर, चीनने तैवानच्या आसपासच्या पाण्यात प्राणघातक क्षेपणास्त्रे डागली आहेत. मात्र, ही क्षेपणास्त्रे त्यांच्या लष्करी सरावाचा एक भाग असल्याचे चीनचे म्हणणे आहे. पण बीजिंग तैवानला त्याच्या लष्करी सामर्थ्याची भीती दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याचे अमेरिकेचे मत आहे.

पीपल्स लिबरेशन आर्मीने गुरुवारी मोठ्या प्रमाणावर लष्करी सराव केल्याचा दावा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने केला आहे. यादरम्यान, तैवान बेट पूर्णपणे बंद करण्यात आले होते. नॅन्सी पेलोसी यांनी चीनच्या सार्वभौमत्वाचे घोर उल्लंघन करून तैवानला भेट दिल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

चीनचे सैन्य तैवान बेटावर सातत्याने गोळीबार करत आहे. चीनने तैवानविरुद्ध नवे युद्ध सुरू केल्याचे दिसते. चिनी मीडियाचा दावा आहे की त्यांचा लष्करी सराव अगदी वास्तविक युद्धासारखा आहे. ज्यामध्ये तैवानला पूर्णपणे वेढा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे संतप्त झालेल्या चीनने आता युरोपियन युनियनमधील सात देशांच्या राजदूतांना बोलावले आहे.

तैवानच्या सीमेवर चीनचा लष्करी सराव चुकीचा असून तो त्वरित थांबवावा, असे या देशांच्या वतीने निवेदनात म्हटले आहे. या संदर्भा चीनचे म्हणणे आहे की, युरोपीय देशांचे हे विधान आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणारे आहे.


हेही वाचा – आजीने आणीबाणी लावली होती, लक्षात आहे का? भाजपाचा काँग्रेसवर पलटवार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -