घरदेश-विदेशचीनमध्ये आता तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी, वयोवृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे घेतला निर्णय

चीनमध्ये आता तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी, वयोवृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे घेतला निर्णय

Subscribe

चीनने हे पाऊल का उचलले?

वाढती लोकसंख्या आणि यात वयोवृद्धांचा वाढत्या संख्येमुळे चीन सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून चीनमध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त होत आहे. यात अनेक अर्थतज्ज्ञांकडूनही चीनमधील लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. यानंतर चीन सरकारने काही वर्षांपासून लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक नियम घातले आहेत. तसेच दोन मुले जन्माला घालण्यासाठी टू चाइल्ड पॉलिसी अंतर्गत परवानगी दिली होती. यामुळे चीनमध्ये लोकसंख्या नियंत्रणात आली मात्र वयोवृद्धांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे चीन सरकारने आता हा नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता चीनमध्ये एका जोडप्याला आता तीन मुले जन्माला घालण्याची परवानगी असणार आहे. यापूर्वी चीनमध्ये केवळ दोन मुलांना जन्म घेण्याची परवानगी होती.

अलीकडेच चीनमध्ये जन्मदरात घट होत वयोवृद्धांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे एका अहवालातून उघडकीस आले. या अहवालात वयोवृद्धांचा मोठा वर्ग वाढत असल्याने लोकसंख्येवर त्याचे भविष्यकालीन परिणाम जाणवतील अशी भीती व्यक्त होत असल्याने चीन सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे चीनमधून टू चाइल्ड पॉलिसी संपूष्टात आली आहे.

- Advertisement -

चीनने हे पाऊल का उचलले?

अलीकडेच चीनने आपल्या लोकसंख्येचे आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार गेल्या दशकात चीनमधील मुलांचा सरासरी जन्म दर सर्वात कमी होता. याचे मुख्य कारण म्हणजे चीनची टू चाइल्ड पॉलिसी.या आकडेवारीनुसार, चीनमध्ये २०१० ते २०२० या काळात लोकसंख्या वाढीचा वेग हा ०.५३ इतका होता. मात्र मागच्या दोन दशकात चीनमधील लोकसंख्या वाढीची गती मंदावली आहे. इतकेच नव्हे तरी २०२० या वर्षात चीनमध्ये केवळ १२ दशलक्ष मुलेच जन्माला आली.
२०१८ ही संख्या १८ दशलक्ष होती. त्यामुळे १९६० नंतर चीनमध्ये जन्मणाऱ्या मुलांच्या संख्येने सर्वात कमी टप्पा गाठला.

चीनमध्ये बाल जन्म धोरण अगदी कठक असले तरी चीन अजूनही जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश राहिला आहे. यानंतर भारत आणि अमेरिकेचा क्रमांक लागतो. यापूर्वी चीनमध्ये वन चाईल्ड पॉलिसी आणण्यात आली होती. मात्र यामुळे चीनमधील जन्माला येणाऱ्या मुलांची गती कमी झाली. यामुळे वन चाईल्ड पॉलिसी रद्द करत चीन सरकारने दोन मुले जन्माला देण्य़ाची मुभा दिली. यानंतर आता पुन्हा दोन मुले जन्मला देण्याचा निर्णायाचा विपरीत परिणाम दिसल्याने चीन सरकारने तीन मुलांना जन्म देण्यास परवानगी दिली आहे.


SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँकेतून पैसे काढण्याच्या नियमात बदल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -