घरताज्या घडामोडीड्रॅगनची नवी खेळी! भारताच्या सीमेवर हेलिकॉप्टरची फौज तयार करण्यात चीन दंग

ड्रॅगनची नवी खेळी! भारताच्या सीमेवर हेलिकॉप्टरची फौज तयार करण्यात चीन दंग

Subscribe

हेलिकॉप्टरच्या फौजला मजबूत बनवण्यासाठी नवीन खेळी

बीजिंग: लडाखपासून ते अरूणाचल प्रदेशपर्यंत भारताच्या जवळील सीमेवर असलेल्या तिबेटमध्ये चीनकडून हेलीकॉप्टरची फौज तयार करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हेलिकॉप्टरला ठेवण्यासाठी चीन तिबेटमध्ये एक हेलीपोर्ट सुद्धा बनवत आहे. जवळपास १०० लढाऊ आणि काही हेलिकॉप्टरांना लपवून ठेवलं जाऊ शकतं. अशाच प्रकारचे हेलीपोर्ट तिबेटमध्ये बनवले जात आहेत. सॅटलाईटने मोठा खुलासा करत सांगितलंय की, चीन भारताला लागून असलेल्या भागात नवीन एअरबेस बांधत आहे आणि जुने एअरफिल्ड अपग्रेड करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चीन या भागात आपल्या हेलिकॉप्टरच्या फौजला मजबूत बनवण्यासाठी ही नवीन खेळी करत आहे. यासाठी चीन अजून मोठमोठे हेलीपोर्ट देखील बांधणार आहे. तिबेटचे पठार सर्वात उंच असून ते डोंगर रांगांनी वेढलेलं आहे. चीन आपल्या हवाई मार्गाची दीशा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे सैनिकांना एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. तसेच आपात्कालीन परिस्थितीमध्ये सैनिकांना मदत पोहोचवली जाऊ शकते.

- Advertisement -

सर्वात उंचीवर असलेल्या भागात मोहीम राबवणे सोपे

२०२० मध्ये चीनने आपल्या जे-२० हेलिकॉप्टरला तिबेटमध्ये तैनात केलं होतं. त्यामुळे सर्वात उंचीवर असलेल्या भागात मोहीम राबवणे सोपे झाले आहे. एवढेच नाही तर इतरही अनेक हेलिकॉप्टरला या भागात तैनात करण्यात आले आहेत. चीनने गोलमुडमध्ये एक सर्वात मोठं हेलीपोर्ट बांधल्याचं चित्र सॅटेलाईटच्या माध्यमातून समोर आलं आहे. येथे हेलिकॉप्टर्ससाठी ६३ हँगर्स दिसतात. याव्यतिरिक्त येथे अनेक इमारती देखील बांधण्यात आल्या आहेत.

हे हेलीपोर्ट बांधण्यासाठी चीनने २०२० साली सुरूवात केली होती. त्यानंतर जवळपास हे काम पूर्ण झालंय. गोलमुड ऐतिहासिक दृष्ट्या तिबेटचा एक भाग आहे. परंतु हा भाग आता चीनच्या किंघाई प्रांतमध्ये स्थित आहे. लडाखच्या सीमेवर सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान चीनच्या सैनिकांनी गोलमुडमध्ये पूर्ण अभ्यास केला आहे. येथे चीनने प्रशिक्षण केंद्र सुद्धा तयार केलं आहे. तसेच देशाच्या अनेक मार्गांना जोडलेला एक रेल्वेचा सरळ मार्ग सुद्धा आहे.

- Advertisement -

चीनच्या सैनिकांची ताकद वाढणार

या एअरपोर्टवर आधीच चीनसाठी एक प्रमुख लॉजिस्टिक हब म्हणून काम करत होता. चीनकडून आपले लढाऊ विमान, बॉम्ब, अलर्ट विमान आणि वाहतुकीच्या विमानांवर नजर ठेवली जाते. काही निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार, हे हेलीपोर्ट पूर्णपणे बनवून तयार झालं आहे. तसेच चीनच्या सैनिकांची ताकद देखील वाढली आहे. त्यामुळे भारताच्या सैनिकांवर हल्ला करणं चीनला आता सोप होणार आहे.

दरम्यान, भारताच्या सीमेलगत असणाऱ्या भागांमध्ये चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती सातत्याने सुरूच असतात. त्याध्ये भारत आणि चीनमधील तणाव वाढत आहे. चीन आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक, राजकीय आणि लष्करी पातळीवरील चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. तसेच भारतीय सीमेलगत असणाऱ्या चीनने अमेरिकन युद्धनौका नष्ट करण्याचा देखील सराव केल्याचं सांगितलं जात होतं.


हेही वाचा: Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार : छगन भुजबळ


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -