चीनच्या कुरापती थांबेना, अक्साई भागातल्या सीमेजवळ रेल्वेलाइनचे काम सुरू

चीनच्या कुरापती सुरुच असल्याने भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण चीन LAC जवळ नवीन रेल्वे लाईन उभारण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे.

चीनच्या कुरापती सुरुच असल्याने भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण चीन LAC जवळ नवीन रेल्वे लाईन उभारण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. ही प्रस्तावित रेल्वे लाईन प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) आणि वादग्रस्त अक्साई चीन परिसरातून जाणार आहे. (china is preparing to lay new rail line near line of actual control which may raise concerns for india)

चीन सीमावर्ती भागात सातत्याने बांधकाम करत असून, सोयी-सुविधा वाढवण्यावर भर देत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सीमेलगतच्या भागात पायाभूत सुविधा अधिक मजबूत करत आहे.

रेल्वे तंत्रज्ञान विभागाच्या रिपोर्टनुसार, या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे भारत आणि नेपाळपासून चीनच्या सीमेपर्यंत नवीन मार्ग तयार करण्यात येणार आहे. हा नवीन रेल्वे मार्ग तिबेटमधील शिगात्से येथून सुरू होणार असून, वायव्येकडील नेपाळ सीमेजवळून जाणार आहे.

भारताचा अक्साई चीन (सुमारे 38,000 चौरस किमी क्षेत्र) चीनच्या ताब्यात होता. हा भाग दोन्ही देशांमधील वादाचा मुद्दा राहिला आहे. रेल्वे तंत्रज्ञानाने आपल्या अहवालात सांगितले आहे की, तिबेटची ‘मध्यम ते दीर्घकालीन रेल्वे योजना’ 2025 पर्यंत TAR रेल्वे नेटवर्कचे सध्याच्या 1,400 किमीवरून 4,000 किमीपर्यंत विस्तार करण्यास मदत करेल. तिबेट स्वायत्त प्रदेश (TAR) सरकारने जारी केलेल्या नवीन रेल्वे योजनेत हे उघड झाले आहे.

चीनच्या या नव्या प्रकल्पामध्ये भारत आणि नेपाळपासून चीनच्या सीमेपर्यंत नवीन रेल्वेमार्गांचा समावेश असेल. हा नवीन रेल्वे मार्ग तिबेटमधील शिगात्से येथून सुरू होईल आणि वायव्येकडील नेपाळ सीमेजवळून जाईल. यापुढे अक्साई चिनच्या उत्तरेतून जाऊन शिनजियांगमधील होटन येथे संपेल.


हेही वाचा – अतिरेक्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानने अफगाणिस्तानला दिला दहशतवादाच्या निर्मूलनाचा सल्ला!