घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus: हिवाळ्यात पुन्हा कोरोना व्हायरसचं संकट येणार!

CoronaVirus: हिवाळ्यात पुन्हा कोरोना व्हायरसचं संकट येणार!

Subscribe

संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संकटाशी सामना करत आहे. जगातील बऱ्याच देशांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. या जीवघेण्या व्हायरसवर अद्यापही कोणतही लस सापडली नाही आहे. दरम्यान कोरोना व्हायरसचं संकट नोव्हेंबर महिन्यात पुन्हा येणार असल्याचा दावा चीनच्या तज्ज्ञांनी केला आहे.

दुसऱ्यांदा कोरोना व्हायरसच्या संकटला चीन आणि इतर देश सामना करू शकतात. नोव्हेंबर पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोना व्हायरस प्रसार होऊ शकतो. सध्या हळूहळू चीन पूर्वपदावर येत आहे. पण तज्ज्ञांनी असं म्हटलं की, जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था पुन्हा एकदा धोक्यात येऊ शकते.

- Advertisement -

कोरोना व्हायरसच्या महामारी विरोधात काम करणाऱ्या शांघाय क्लिनिकल टीमचे नेतृत्व करणारे वैज्ञानिक झांग व्हेनहाँग यांचे म्हणणे आहे की, देशात थैमान घातलेल्या या व्हायरसचे बारकाईने निरीक्षण केले पाहिजे. संपूर्ण देश या जीवघेण्या व्हायरसशी सामना करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. पण हा व्हायरस पुन्हा एकदा पसरणार आहे. हिवाळ्याच्या सुरुवातील या व्हायरसची पुन्हा पसरणार आहे.

झांग व्हेनहाँग पुढे म्हणाले की, चीनला कोरोना रोखण्याचा अनुभव असल्यामुळे दुसऱ्यांदा चीन कोरोनावर मात करू शकले. लॉकडाऊन पुन्हा करण्याची आवश्यकता नाही आहे. पुन्हा कोरोनाला रोखण्यासाठी सुरुवातीपासूनच उपययोजना करायला पाहिजे. चीन हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच्या दरम्यान झांग यांनी असा दावा केला आहे. कारण चीन पुन्हा एकदा अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. आतापर्यंत चीनमध्ये ८२ हजार ३४१ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३ हजार ३४२ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

चीनमधील वुहान शहरात उद्यास आलेल्या कोरोना व्हायरस रोखण्यावर यश मिळवलं आहे. चीनमध्ये जे नवे रुग्ण आढळत आहेत. ते परदेशातून आले असल्याचं सांगितलं जात आहे. चीन कोणत्याही प्रकारे लॉकडाऊन जाहीर करणार नाही असा दावा झांग यांनी केला आहे. सर्व देशांना एकत्रितपणे या संकटाचा सामना करावा लागण आहे. जर सर्व देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश प्राप्त केलं तर आपण सर्वजण जगू शकू, असं झांग म्हणाले.


हेही वाचा – बायको अडकली माहेरी, नवऱ्याने प्रेयसीलाच लग्न करून आणलं घरी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -