घरताज्या घडामोडीचीनने घेतली माघार! पूर्व लडाखमधून अडीच किलोमीटर सैन्य घेतले मागे

चीनने घेतली माघार! पूर्व लडाखमधून अडीच किलोमीटर सैन्य घेतले मागे

Subscribe

गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनच्या दरम्यान लडाखमध्ये तणाव वाढला होता. पण आता तणावाची परिस्थिती नियंत्रणात आल्याचे पाहायला मिळत आहे. माहितीनुसार, पूर्व लडाखच्या गलवान भागातून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे सरकले असून त्यांनी वाहने देखील मागे घेतली आहे. तसेच भारताने देखील आपले काही सैन्यही मागे घेतले आहे.

गेल्या महिन्यात चीनने पूर्व लडाखमध्ये एलएसीजवळ आपले सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू झाला. यात पँगाँग त्सो लेक आणि गॅल्व्हन व्हॅलीचा समावेश आहे. दरम्यान अनेकदा चिनी सैन्य आणि भारतीय सैन्य आमनेसामने आले होते. त्यामुळे दोनच दिवसांपूर्वीच दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. त्याचा आज सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला.

- Advertisement -

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आता लडाखमधील अनेक ठिकाणांवरून चिनी सैन्य मागे सरकले असून त्यानंतर भारताने देखील आपले सैन्य मागे घेतले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान गलवान, पेट्रोलिग पॉईंट १५ आणि हॉस स्प्रिंग भागातून भारत आणि चीन सैन्य अडीच किलोमीटर मागे गेल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

सोमवारी रात्रीपासूनच सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यानंतर मंगळवारी पहाटे पर्यंत ही प्रक्रिया सुरूच होती. चीनने सैन्य मागे घेतल्यानंतर भारताने देखील आपले सैन्य मागे घेतले.


हेही वाचा  – Video: चीनला चोख उत्तर देण्यासाठी भारतीय जवान सज्ज; पाहा व्हिडिओ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -