घरताज्या घडामोडीचीनने नेपाळलाही दिला धोका; नेपाळचा ३३ हेक्टर भूभाग बळकावला

चीनने नेपाळलाही दिला धोका; नेपाळचा ३३ हेक्टर भूभाग बळकावला

Subscribe

चीनने आपली आक्रमक विस्तारवादी भूमिका कायम ठेवत मित्र राष्ट्र असलेल्या नेपाळलाही धोका दिला आहे. चीनने नेपाळचा तब्बल ३३ हेक्टर भूभाग बळकावला असल्याचा धक्कादायक खुलासा नेपाळ सरकारच्या एका अहवालामध्ये करण्यात आला आहे.

चीनने आपली आक्रमक विस्तारवादी भूमिका कायम ठेवत मित्र राष्ट्र असलेल्या नेपाळलाही धोका दिला आहे. चीनने नेपाळचा तब्बल ३३ हेक्टर भूभाग बळकावला असल्याचा धक्कादायक खुलासा नेपाळ सरकारच्या एका अहवालामध्ये करण्यात आला आहे. तसेच नदी पात्र बदलवून आणखी प्रदेश बळकावण्याची शक्यता असल्याचाही अंदाज आहे. विशेष म्हणजे चीनने सीमा बदलासाठी चक्क नद्यांचेही प्रवाह बदलले असल्याचे समोर आले आहे.

चीनने मागील काही काळात आपल्या विस्तारवादी धोरणांवर काम करण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा होती. त्यातच तैवान, जपान आणि भारतासोबत सीमा प्रश्नामुळे चीनसोबतचा तणाव वाढला आहे. त्याच आता नेपाळच्या भूभागावर चीनने ताबा मिळवला असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

नदीचा प्रवाह बदलून नैसर्गिक सीमा तयार

चीनने तिबेटमध्ये रस्ते निर्मितीच्या नावाखाली सुरू केलेल्या बांधकामा दरम्यान नेपाळच्या भूभागावर ताबा मिळवला आहे. त्याचप्रमाणे कृषी मंत्रालयाच्या सर्वेक्षण अहवालानुसार; १० जागांवर चीनने ताबा मिळवला असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय, नेपाळच्या ३३ हेक्टर जमिनीवर नदीचा प्रवाह बदलून नैसर्गिक सीमा तयार करत ताबा मिळवला असल्याचे अहवालात म्हटले आहे.

या नद्यांचा बदला प्रवाह

बगडरे खोला नदी आणि करनाली नदीचा प्रवाह बदलण्यात आला आहे. हुमला जिल्ह्यातील १० हेक्टर जमिनीवर चीनने अतिक्रमण केले आहे. त्याशिवाय नेपाळची सहा हेक्टर जमीन रसूवा जिल्ह्यातील सिंजेन, भुरजूक आणि जांबू खोला या ठिकाणी रस्ते बदलण्यात आल्यामुळे अतिक्रमणात ही जागा चीनने बळकावली आहे. चीन सरकार तिबेट स्वायत्त प्रदेशात रस्ते बांधत आहे. या कामादरम्यान, नदीचे प्रवाह बदलण्यात आले आहे. चीनकडून असे काम सुरू राहिल्यास या ठिकाणचा नेपाळचा मोठा भूभाग चीनमध्ये जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – चीनमध्ये वटवाघुळानंतर आता कुत्र्याच्या मांस विक्रीचा बाजार सुरू!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -