घरताज्या घडामोडीकरोना व्हायरसची धास्ती, चीनमध्ये मास्क म्हणून वापरला जातोय 'ब्रा'

करोना व्हायरसची धास्ती, चीनमध्ये मास्क म्हणून वापरला जातोय ‘ब्रा’

Subscribe

चीनमध्ये थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसने इतर देशांमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत ९८१६ नागरिकांना याची लागण झाली आहे. एकट्या चीनमध्येच ९६९२ करोनाग्रस्त आहेत. यात २१३ लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा व्हायरस हवेतून पसरत असल्याने चीनमध्ये नागरिकांना मास्क घालूनच फिरावे लागत आहे. यामुळे येथे मास्कची टंचाई निर्माण झाल्याने नागरिक अजब गोष्टींचा वापर मास्क म्हणून करताना दिसत आहेत. यात ब्रा (Bra) सेनेटरी पॅड (Sanitary Pads) संत्र्याचे साल यांचा वापर मास्क म्हणून करताना दिसत आहेत.

- Advertisement -

काहीजण प्लास्टीकच्या रिकाम्या बाटल्यांचा उपयोग मास्क म्हणून करताना दिसत आहे. हे मास्क दिसायला जरी विचित्र वाटत असले तरी त्यामागे वैज्ञानिक कारण असल्याचे बोलले जात आहे. चीनमध्ये करोना संसर्गग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे येथे संसर्ग रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘सर्जिकल मास्क’ जी डॉक्टर ऑपरेशन करतेवेळी घालतात त्यांची कमतरता निर्माण झाली आहे. जे मास्क बाजारात उपलब्ध आहेत त्यांच्या किंमती जास्त आहेत. त्यातच बाहेर जाताना वापरलेला मास्क पुन्हा वापरणे धोकादायक असल्याचे येथील तज्त्रांनी सांगितले आहे. यामुळे चीनमध्ये नागरिक मिळेल त्या वस्तू वा कपड्याचा वापर मास्क म्हणून करू लागले आहेत. सोशल मीडियावरही या मास्कचे फोटो व्हायरल होत आहेत. यात काहीजण महिलांचे अंतर्वस्त्र असलेल्या ब्राच्या ‘कप’ चा मास्क म्हणून वापरत करत असताना दिसत आहेत. तर काहीजण जुन्या मास्कमध्ये सेनेटरी पॅड ठेवून तो वापरत असल्याचे दिसत आहे. तर काही जण संत्र्याचे सालाचे मास्क बनवून ते वापरत असल्याचे चीनच्या रस्त्यावर बघायला मिळत आहे.

- Advertisement -

बाजारात अचानक मास्कची मागणी वाढल्याने काहीजणांनी दुसऱ्यांनी वापरलेले मास्क वापरण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. यास येथील आरोग्य विभागाने विरोध दर्शवला असून सेकंड हँड मास्क वापरण्यास मनाई केली आहे.

तर दुसरीकडे नागरिक मास्क टंचाईतून मार्ग काढण्यासाठी नवनवे प्रयोग करत आहे. यामुळे अमेरिका , इंग्लंड, कोरियासह अनेक देशांनी चीनला मास्कचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच चीनने शेजारील देशांकडून फळे व भाज्यांची आयात करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -