घरदेश-विदेशChina Plane Crash : चीनच्या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॕक बॉक्सचा तपास सुरू, १३२...

China Plane Crash : चीनच्या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॕक बॉक्सचा तपास सुरू, १३२ जणांच्या फ्लाईटमध्ये सर्वांचाच मृत्यू झाल्याचे घोषित

Subscribe

चीनमधील ग्वांगझूजवळ क्रॅश झालेल्या चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या विमानातील सर्व 132 जणांचा मृत्यू झाला आहे. यात प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. बोईंग 737 असे या अपघातग्रस्त विमानाचे नाव होते. दरम्यान अपघातील वेळी या विमानातून 123 प्रवासी आणि 9 क्रू मेंबर्स प्रवास करत होते. दरम्यान मंगळवारी चिनी विमान वाहतूक अधिकार्‍यांनी अपघातग्रस्त विमानातून वाचलेल्या कोणत्याही व्यक्तीचा शोध लागला नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे विमानातील सर्वांच प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

चीनच्या सरकारी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हू झेजियांग यांनी सांगितले की, तपास पथकाचे ऑपरेशन पुर्ण झाले आहे. तपास यंत्रणेने डीएनए चाचणीद्वारे 120 मृतांची ओळख पटवली आहे. दरम्यान तपास पथकाला विमानातील दोन्ही ब्लॅक बॉक्स अपघाताच्या चौथ्या दिवशी सापडला आहे

- Advertisement -

चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या बोईंग 737 विमानाने 21 मार्चला चीनच्या कुनमिंगहून ग्वांगझू गंतव्यस्थानावर जाण्यासाठी उड्डाण केले होते, परंतु हे विमान दुपारी 2:38 च्या सुमारास कोसळले. वुझोउ शहरातील टेंगजियान काउंटीच्या मोलांग गावाजवळील डोंगराळ भागात विमान हे कोसळले, ज्यामुळे पर्वताला आग लागली. अपघातावेळी या विमानतून 132 प्रवासी प्रवास करत होते. या घटनेनंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंनपिंग यांनी तातडीने बचाव कार्य सुरु करण्याचे आदेश दिले. दरम्यान तपास यंत्रणेकडून या अपघाताचे कारण शोधले जात असून विमान वाहतूक क्षेत्र आणि लोकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी विमान वाहतूक क्षेत्रात सुधारण करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

Guanxi क्षेत्राचे अग्निशमन प्रमुख झेंग शी यांना आतापर्यंत विमानाच्या अवशेषाचे 183 तुकडे, मृतांचे अवशेष आणि काही सामान सापडले असून ते तपास पथकाकडे सोपवण्यात आले आहेत. ऑपरेशनमध्ये सहभागी असलेले कर्मचारी घनदाट जंगलात हँड टूल्स, मेटल डिटेक्टर, ड्रोन आणि श्वानांच्या मदतीने शोध घेत आहेत. 


Andhra pradesh Bus accident : आंध्रप्रदेशच्या चित्तूरमध्ये भीषण बस अपघात; 7 ठार, 45 जखमी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -