घरदेश-विदेशमुलांच्या चुकीची शिक्षा पालकांना भोगावी लागणार, चीनमध्ये नवा कायदा

मुलांच्या चुकीची शिक्षा पालकांना भोगावी लागणार, चीनमध्ये नवा कायदा

Subscribe

चीनमध्ये आता मुलांनी केलेल्या चुकीची शिक्षा पालकांना भोगावी लागणार आहे. त्यासाठी चीन सरकारकडून नवा कायदा आणण्याची तयारी सुरु आहे. यामुळे मुलांनी कोणते वाईट वर्तन केले किंवा गुन्हा केल्यास त्यांच्यां आई-वडीलांना दंड किंवा शिक्षा ठोठवण्यात येणार आहे. हा कायदा आणण्यासाठी चीन संसद एका विधेयकावर विचार करत आहे. त्यामुळे चीनसह अनेक देशांमध्ये या कायद्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

कुटुंब शिक्षण प्रोत्साहन कायद्याच्या (Family Education Promotion Law) प्रस्तावित मसुद्यात यााबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. यात म्हटले की, मुलांच्या गुन्ह्यासाठी त्यांचे पालक किंवा सांभळकर्त्यांविरोधात दंड ठोठावला जाईल. यासोबतचं पालकांच्या देखरेखी खाली असतानाही मुलांचे वर्तन वाईट, गुन्हेगारी प्रवृत्ती असल्यास अशा मुलांना फॅमिली एज्युकेशन गाइडेंस प्रोग्राम सेंटरमध्ये पाठवले जाईल.

- Advertisement -

यावर नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या विधेयकांबाबतचे आयोगाचे प्रवक्ते झांग तिइवेई यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांकडून होत असलेल्या गैरवर्तवणुकीमागे अनेक कारणं असतात. यात कुटुंबाकडून योग्य प्रकारचे शिक्षण न मिळण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे पालकांना दोषी ठरवले जाणार आहे. जेणेकरुन ते आपल्या मुलांकडून कोणतेही गैरवर्तवणूक होणार नाही, याची काळजी घेतली.

या कायाद्यात पालकांना आवाहन करण्यात आलेय की, आपल्या मुलांना आराम करण्य़ास, खेळण्यास आणि व्यायाम करण्यासाठी वेळ ठरवून द्यावा. येत्या आठवड्यात या कायद्याच्या मसुद्यावर एनपीसीच्या स्थायी समितीत चर्चा होण्याची शक्यता आहे. चीनमध्ये सध्या ऑनलाइन गेमिंग आणि इंटरनेटवरील सेलिब्रेटींचे दिवाने असणाऱ्यांविरोधात सरकाराने मोहिम सुरु केली आहे. चीनमध्ये ऑनलाईन व्हिडिओ गेमला ‘अफू’ची संज्ञा देण्यात आली आहे.

- Advertisement -

चीनच्या शिक्षण मंत्रालयाने लहान मुलांच्या व्हिडिओ गेम खेळण्याच्या तासावरही अनेक बंधने घातली आहेत. तेथे लहान मुलांना लहान मुलांना शुक्रवार, शनिवार आणि रविवारी फक्त एकच तास ऑनलाइन गेम खेळण्याची परवानगी आहे. त्याशिवाय चीनने लहान मुलांचा गृहपाठ कमी देण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. याशिवाय सुट्टीच्या दिवशी प्रायव्हेट क्लासेस घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. लहान मुलांवर अभ्यासाचा ताण वाढत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -