लॉकडाऊन नको, चीनमध्ये सरकारविरोधातील आंदोलनात 10 जणांचा मृत्यू

चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. मागील काही दिवसांत 30 हजाराहून अधिक नवीन कोरोना रुग्ण चीनमध्ये आढळले. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चीनच्या प्रशासनाने लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र, या लॉकडाऊनला चीनच्या जनतेने विरोध केला आहे.

चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. मागील काही दिवसांत 30 हजाराहून अधिक नवीन कोरोना रुग्ण चीनमध्ये आढळले. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चीनच्या प्रशासनाने लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र, या लॉकडाऊनला चीनच्या जनतेने विरोध केला आहे. पुन्हा लॉकडाऊन नको यासाठी आंदोलन चीनच्या जनतेने केले. विशेष म्हणजे या आंदोलनात 10 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. (china protest against covid lockdown demand to remove lockdown)

चीनमधील बीजिंगमध्ये गुरुवारपासून रविवारपर्यंत दररोज सुमारे 30 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस हा आकडा वाढताना दिसत आहे. बहुतेक रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत. त्यामुळे चीन सरकारने पुन्हा एकदा झिरो कोविड धोरण लागू करत अनेक शहरांमध्ये कठोर निर्बंध आणि लॉकडाऊन लागू केला आहे.

शिवाय, राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या शून्य कोविड धोरणालाही देशात विरोध होऊ लागला आहे. लॉकडाऊन मागे घेण्याची मागणी करत लोक रस्त्यावर उतरले आहेत. नानजिंग आणि बीजिंगसह अनेक शहरांमधील विद्यापीठांमधील विद्यार्थी शांततापूर्ण निदर्शनांसाठी हातात कोरे कागद घेऊन दिसले. मात्र त्यानंतर आंदोलन तीव्र झालं या आंदोलनात 10 जणांचा मृत्यू झाला.

या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रविवारी एका दिवसात 40,000 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशात सलग चौथ्या दिवशी संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये शांघायसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाल्यापासून ही संख्या सर्वाधिक आहे.

चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून, क्वारंटाईन सेंटरमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. गरजेनुसार नवीन क्वारंटाईन सेंटर उभारली जात आहे. बीजिंगमधील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनबाबत आणि कठोर निर्बंधांमुळे अन्नपदार्थ आणि इतर आवश्यक वस्तूंची मागणी वाढली आहे. चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

शहरातील बहुतेक नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. जागोजागी नाकेबंदी करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्याआधी कोरोना अहवाल तपासला जात आहे. अनेक शहरांमध्ये मॉल, सिनेमागृहे बंद करण्यात आली आहे.


हेही वाचा – ‘मरे’च्या दादर रेल्वे स्थानकातील गर्दीचे होणार विभाजन; प्रवाशांना मोठा दिलासा