लडाखमध्ये चीनची पुन्हा घुसखोरी, लढाईसाठी केली पूर्वतयारी; सॅटेलाइटमधून मोठा खुलासा

लडाख परिसरात सीमेवरील चीनी सैन्याच्या कुरापतीमुळे कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा लागेल या हेतूने भारतानेही आपले सैन्य सीमेवर गेली दोन वर्ष सज्ज ठेवले आहे. चीनच्या कुरापतीमध्ये आणखी एका प्रकाराची भर पडली आहे. चिनी सैनिकांनी पूर्व लडाखमधील गोगरा-हॉट स्प्रिंग्स येथील LOCवर कब्जा केला होता. परंतु चिनी सैन्य हे कब्जा केलेल्या स्थानापासून ३ किमी अंतरावर पाठीमागे परतले आहेत. ही एक विघटन प्रक्रिया असून या ठिकाणी येण्यासाठी त्यांना प्रेरित करण्यात आलं. जिथे २०२० मध्ये भारतीय सैनिकांनी तळ ठोकला होता.

NDTV या हिंदी वृत्तावाहिनीने सॅटेलाइटमधून एका चित्राबाबत खुलासा केला आहे. यावर त्यांनी चिनी सैनिकांच्या हालचालींना लक्ष्य केलं आहे. 12 ऑगस्ट, 2022 चे छायाचित्रे पाहिल्यानंतर असे दिसून आले की, चिनी सैनिकांनी LOCच्या जवळील एका भागात एक मोठी इमारत तयार करण्यात आली होती. ज्याठिकाणी भारतीय सैन्य तेथे तळ ठोकून बसायचे. हा परिसर संपूर्ण खोलदरीत आढळतो.

15 सप्टेंबरचे एक छायाचित्रे पाहिल्यानंतर असे दिसून आले की, चिनी सैनिकांनी या इमारतीला पाडले आहे. त्यानंतर ढिगाऱ्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले आहे.

याआधी देखील चीनच्या हॅकर्सनी सीमेवरील वीज केंद्रांच्या ग्रीडवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती. उत्तर भारतात लडाख आणि परिसरातील वीज वितरण व्यवस्थेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न चीनच्या हॅकर्सनी केला होता.


हेहीै वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत; नाना पटोलेंचा गंभीर आरोप