गलवान खोऱ्यातील संघर्षाचा व्हिडिओ चीनी माध्यमांनी केला प्रसारित

China Releases Galwan Clash Video, Shows Confrontation With Indian Troops
गलवान खोऱ्यातील संघर्षाचा व्हिडिओ चीनी माध्यमांनी केला प्रसारित

गेल्या वर्षी गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैन्यात झालेल्या संघर्षाचा व्हिडिओ आता चीनी सरकारी माध्यमांनी प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये शेकडो भारतीय आणि चीन सैनिक पूर्व लडाखमधल्या गलवान खोऱ्यात एकमेकांसोबत लढताना दिसत आहेत. १५ जून २०२० साली गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैनिकात संघर्ष झाला होता. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. यात चीनचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये चार चीनी सैनिकाचा मृत्यू झाल्याची कबुली चीनने अधिकृतपणे पहिल्यांच दिली आहे. चीनी सैन्याचे अधिकृत वृत्तपत्रे ‘पीएलए डेली’ने शुक्रवारी दिलेल्या वृत्तानुसार ‘सेंट्रल मिलिटरी कमिशन ऑफ चायना’ने (CMC) काराकोरम रांगेत चीनी अधिकारी आणि सैनिकांना तैनात केले होते. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारताविरुद्ध झालेल्या या संघर्षात भारतासोबत चीनचे सैन्यांनी देखील प्राण गमावला.

‘ग्लोबल टाईम्स’ आणि ‘पीएलए डेली’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘या संघर्षात चीनच्या सैन्याचे नेतृत्व करणारे कर्नल क्यू फेबाओ सामील होते. ते सुद्धा यामध्ये गंभीर जखमी झाले होते. गलवान खोऱ्यामधील झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. पण आता भारत आणि चीन हे दोन्ही देश जेव्हा पँगाँग सरोवरच्या उत्तर आणि दक्षिण तटापासून आपले जवान मागे घेत आहेत, तेव्हा पीएलएने म्हणजेच चीन सरकारने संघर्षाबाबत कबुली दिली आहे. चीनने जरी गलवान संघर्षात चार सैनिक ठार झाल्याचे सांगितले असेल तरी, भारताचे म्हणणे आहे की, या संघर्षात चीनचे ४० पेक्षा अधिक सैनिक ठार झाले आहेत. गलवान नदीजवळ १५ हजार फूट उंचीवर हा संघर्ष झाला होता.


हेही वाचा –  भाजपच्या युवा नेत्या पामेला गोस्वामीच्या कारमध्ये सापडलं कोकेन; पोलिसांनी केली अटक