घरदेश-विदेशचीनमध्ये मुस्लिमांना रोजा ठेवण्यास मनाई

चीनमध्ये मुस्लिमांना रोजा ठेवण्यास मनाई

Subscribe

रमजानची सुरुवात होताच चीनमध्ये सरकारी अधिकारी, विद्यार्थी आणि मुलांवर रोजा ठेवण्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. चीन सरकारने बेवसाईटवर यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत.

चीनच्या मुस्लिम बहुल शिनजियांग प्रांतामध्ये राहणाऱ्या मुस्लिमांच्या विरोधामध्ये सरकारने अनेक कडक प्रतिबंध घातले आहेत. रमजानची सुरुवात होताच या प्रांतातील सरकारी अधिकारी, विद्यार्थी आणि मुलांवर रोजा ठेवण्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. चीन सरकारने बेवसाईटवर यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. शिनजियांग प्रांतातील चीनचे कम्युनिस्ट पक्षाची स्थानिक संघटना या निर्णयाला अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे. ऐवढेच नाही तर चीनचा पाकिस्तानने देखील या मुद्द्यावर काहीच भूमिका स्पष्ट केली नाही. काही दिवसापूर्वी व्यापारी करारासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान चीनच्या दौऱ्यावर आले होते.

मुस्लिमांवर केला जातोय अन्याय

चीनने दावा केला आहे की, शिनजियांग ओइगर ऑटोनॉमस रीजनमध्ये सामाजिक स्थिरता कायम ठेवण्यासाठी असा निर्णय घ्यावा लागला. मानवी हक्क आयोगाने या आठवड्यामध्ये जारी केलेल्या अहवालामध्ये असा दावा केला आहे की. संयुक्त राष्ट्र समितीने मुस्लिमांवर होत असलेल्या या अन्यायावर चिंता व्यक्त केली आहे. एचआरडब्‍लूच्या रिसर्चर माया बैंग यांनी सांगितले की, शिनजियांमध्ये राहणारे मुस्लिम कुटुंब आपल्याच घरामध्ये निगरानीखाली राहत आहेत. ऐवढेच नाही तर ते काय खातात आणि कधी झोपतात याची देखी सीपीसीला माहिती असते.

- Advertisement -

१० लाख मुस्लिमांना केले कैद

संयुक्त राष्ट्रच्या देखरेख समूहाने सांगितले की, मुस्लिमांना सुरक्षा अभियान आणि चौकशीच्या बहाण्याने लक्ष्य केले जाते. हजारो मुस्लिमांना ताब्यात घेतले असून त्यांना विचारधारा बदलणाऱ्या केंद्रामध्ये पाठवण्यात आले आहे. परदेशातून शिनजियांग प्रांतामध्ये परत आलेले शेकडो विद्यार्थि बेपत्ता झाले आहेत. त्यामधील काही जणांना कैद करुन ठेवण्यात आले आहे यामधील काही जणांचा कैदेमध्ये असतानाच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,१० लाखापेक्षा अधिक लोकांना तथाकथित कट्टरता विरोधी शिबिरामध्ये कैद करुन ठेवण्यात आले आहे. तर अन्य २० लाखांना राजनितीक आणि सांस्कृतिक विचारधारा बदलणारी तथाकथित पुनर्शिक्षण शिबिरामध्ये जबरदस्त पाठवण्यात आले आहे.

डुक्कर खाण्यास केली जाते सक्ती

चीनमध्ये मुस्लिमांनी डुक्कर खाण्याची सक्ती केली जाते. शिनजियांग प्रातांतील जेलमध्ये दोन महिने कैदी असलेल्या ओमिर बेकालीने सांगितले की, चीनमध्ये चाललेल्या या शिबिराचा मुख्य उद्देश लोकांचा धार्मिक विचार नष्ट करणे हा आहे. इस्लाममध्ये डुक्कर खाण्यास सक्त मनाई आहे. चीनमध्ये मुस्लिमांना शुक्रवारच्या दिवशी डुकराचे मटन खाण्याची सक्ती केली जाते. हा दिवस इस्लाममध्ये अतिशय पवित्र मानला जातो तरी देखील अशाप्रकारे सक्ती केली जाते. नमाज पठण करण्यास आणि दाढी वाढवणाऱ्यांना देखील हे लोकं कट्टरतावादी म्हणत ताब्यात घेत कैद करुन ठेवतात. बंदी बनवलेल्यांना स्थानिक भाषा बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. कैद्यांना विद्यार्थी म्हणत त्याठिकाणी सर्व अधिकारी चीनी भाषा वापरतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -