CoronaVirus: चीनचा आडमुठेपणा! म्हणाले, कोणतीही चौकशी होऊ देणार नाही

india bans chinese apps china reaction economic war doklam standoff
Appsच्या बंदीनंतर चीनच्या व्यापार युद्धाच्या धमक्या, म्हणे...

जगभरात कोरोनाने हाहाकार माजवल्यानंतर आता सर्व देशातून हा व्हायरस आलेल्या चीनच्या विरोधातील सूर उमटू लागले आहेत. एकाचवेळी संपूर्ण जगाला लॉकडाऊन होण्याची वेळ या कोरोनाच्या महामारीमुळे आली आहे. या आजारमुळे आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी या देशांकडून चीनला या विषाणूचे प्रमुख केंद्र ठरवत त्यांची तटस्थपणे आंतरराष्ट्रीय चौकशीची कारवाई करण्यासाठी जोर दिला जात आहे. मात्र आम्ही कोणत्याही कारवाईला सामोरे जाणार नसल्याचे सोमवारी चीनने स्पष्ट केले आहे. ही कारवाई कोरण्याही कायदेशीर पद्धतीच्या आधारे होत नसून भूतकाळात आलेल्या माहामारीच्या चौकशीअंती कोणतेही ठोस कारण सापडलेले नाही, असे स्पष्टीकरण चीनने कारवाईला नकार देताना दिले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीचे चान्सलर एंजेला मर्केल यांनी कोविड-१९ संबंधी चीनवर निशाणा साधला आहे. चीनची भूमिका यामध्ये संशयास्पद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांनी कोरोना व्हायरस उत्पत्तीच्या तपासाची मागणी केली असून हा व्हायरस वुहानच्या इंस्टिट्युट ऑफ वायरोलॉजीमधून आला आहे का याचीही चौकशी केली जावी, असे म्हटले आहे. यावर माध्यमांकडून आलेल्या माहितीनुसार चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग यांनी सर्व चौकशींना नाकारले असून कोविड-१९ चे संकट जगावर दिर्घकाळ राहणार असल्याचे सांगत त्यासाठी जगाला सज्ज रहायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.

व्हायरसची उत्पत्ती हा वैज्ञानिकांच्या संशोधनाचा विषय आहे. याचा शोध हा वैज्ञानिक आणि त्या संबंधीच्या तज्ज्ञांनी घ्यायला हवा, अशी प्रतिक्रिया चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग यांनी चौकशीसंबंधी विचारले असता दिली. तसेच हा खुपच किचकट विषय असून याच्या खोलवर जायला खुप कालावधी लागतो. तरीही काही हाती लागतेच असे नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा –

…आणि ‘हुकुमशहा’ प्रेमात पडला! वाचा किम जोंग उन यांची प्रेम कथा