घरCORONA UPDATEचीनने पाकिस्तानला दिले अंडरवेयरचे मास्क

चीनने पाकिस्तानला दिले अंडरवेयरचे मास्क

Subscribe

जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार उडवला असून अनेकजण यात मृत्यूमुखी पडत आहेत. या जीवघेण्या व्हायरसपासून संरक्षण व्हावे यासाठी सोशल डिस्टन्सिंगबरोबरच मास्क घालण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. यामुळे अनेक देशांबरोबरच पाकिस्तानमध्येही मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे मित्रराष्ट्र असलेल्या चीनने पाकिस्तानी नागरिकांसाठी मास्क पाठवले. पण हे मास्क निकृष्ट दर्जाचे असून अंडरवेयरच्या कपड्यापासून बनवण्यात आल्याचे समोर आले . यामुळे पाकिस्तानमध्ये चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

पाकिस्तानमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा दोन हजारावर गेला असून मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पाकिस्तानने चीनकडे मदत मागितली होती. यावेळी पाकिस्तान आपला जवळचा मित्र असल्याने त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन चीनने पंतप्रधान इमरान खान यांना दिले होते. यामुळे अवघा पाकिस्तान चीनकडून येणाऱ्या मदतीच्या प्रतिक्षेत होता. पण चीनने पहिल्या टप्प्यात पाकिस्तानला मास्क पाठवले. हे मास्क एन-95 असतील असे पाकिस्तानला वाटले. पण मास्कचा बॉक्स उघडताच पाकिस्तानी अधिकाऱ्यांना धक्काच बसला. कारण ते मास्क अंडरवेयरच्या कपड्यांपासून बनवण्यात आले होते. जे कोरोना व्हायरस रोखण्यासाठी उपयोगी नव्हते. त्यानंतर पाकिस्तानी सोशल मिडीयावर या मास्कची खिल्ली उडवणाऱ्या पोस्ट व मिम्सचा पाऊस सुरू झाला आहे. ब्रेकींग न्यूज म्हणूनही या मास्कचे व्हिडीओ व फोटो व्हायरल होत आहेत. दरम्यान, स्पेन व नेदरलँडनेही चीनला दिलेली मास्कची ऑर्डर मागे घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -