घरताज्या घडामोडीभारताची डोकेदुखी वाढणार, चीनने बनवला बर्फावर धावणारा रोबोट

भारताची डोकेदुखी वाढणार, चीनने बनवला बर्फावर धावणारा रोबोट

Subscribe

महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चीने कृत्रिम चंद्र, सूर्यानंतर बर्फावर धावणारा सहा पायांचा रोबोट तयार केला आहे. याला स्किईंग रोबोट असे नाव देण्यात आले असून शेनयांग येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात कुठल्याही अडथळ्याला न जुमाणारा हा रोबोट 5 G तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याचे दिसत आहे. सीमेवरील बर्फाळ डोंगरांवर गस्त घालण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येणार आहे. यामुळे भारताची डोकेदुखी मात्र वाढली आहे.

चीनमधील शांघाय जिआओ तोंग युनिवर्सिटीमध्ये हा रोबोट तयार करण्यात आला आहे. माणसाप्रमाणेच हा रोबोट बर्फात स्की करु शकेल अशी त्याची रचना करण्यात आली आहे. सहा पाय असलेला हा रोबोट बर्फाच्या मोठ्या ढिगाराही पळत पार करु शकतो. त्याच्या पायाखाली स्की पोल्सही लावण्यात आले आहेत. यामुळे भुसभुशीत बर्फावरही त्याची पायाची पकड घट्ट राहू शकते. चीनी सैनिकांनी प्रदर्शनात या रोबोटचे प्रात्यक्षिकही दाखवली आहेत. ज्या ठिकाणी सैनिक जाऊ शकत नाहीत अशा कठीण ठिकाणांवरही हा रोबोट पोहचू शकणार आहे. याला चीनचा मशीन याक असेही म्हटले जात आहे. भारताच्या सीमारेषांवर हेरगिरी करण्यासाठीच हा रोबोट बनवण्यात आला आहे. तसेच जवानांपर्यंत शस्त्रास्त्र पुरवण्याचे कामही हा रोबोट करणार आहे. एका वेळी १६० किलो वजन उचलण्याची या रोबोटची क्षमता आहे. तो एका तासात १० किमी वेगाने धावू शकतो असा दावा चीनने केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -