घरदेश-विदेशअमेरिकेच्या लढाऊ विमानासमोर चीनचा हेरगिरीचा फुगा ठरला फुस्स

अमेरिकेच्या लढाऊ विमानासमोर चीनचा हेरगिरीचा फुगा ठरला फुस्स

Subscribe

Spy Balloon in America | वैमानिकांनी केलेल्या या कामगिरीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी वैमानिकांचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे.

Spy Balloon in America | वॉशिंग्टन – हेरगिरी करण्यासाठी चीनने अमेरिकेत फुगा (Spy Balloon) पाठवला होता. मात्र, अमेरिकेच्या F-22 लढाऊ विमानासमोर (Fighter Jet) तो फुगा फारवेळ तग धरू शकला नाही. एका क्षेपणास्त्रातच तो फुगा खाली पाडला गेला. वैमानिकांनी केलेल्या या कामगिरीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी वैमानिकांचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा – सावधान ! परफ्यूमच्या बाटलीत लपवलेला असू शकतो बॉम्ब

- Advertisement -

अमेरिकेच्या आकाशात चीनचा फुगा हेरगिरी असल्याचं समोर आलं होतं. संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, चिनी गुप्तहेर बलूनने अलास्का येथे 28 जानेवारी रोजी पहिल्यांदा अमेरिकेच्या हवाई हद्दीत प्रवेश केला होता. त्यानंतर ते 30 जानेवारी रोजी कॅनेडियन हवाई हद्दीत गेले आणि नंतर 31 जानेवारी रोजी उत्तर आयडाहोवर यूएस एअरस्पेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. यामुळे अमेरिकेची सुरक्षा धोक्यात आली होती. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या फुग्याला पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, F-22 या लढाऊ विमानाने कॅरोलिनाच्या किनार्‍याजवळ नियोजन करून चिनी गुप्तचर बलूनला खाली पाडले. हा फुगा थेट पाण्यात जाऊन पडला. फुग्याचे अवशेष गोळा करण्याकरता समुद्रात जहाज तैनात करण्यात आले आहे. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, F-22 लढाऊ विमानाने 9X सुपरसॉनिक क्षेपणास्त्र डागले आणि एका झटक्यात चिनी गुप्तचर फुगा खाली पडला गेला.

इंटरनेट मीडियावर व्हिडिओ व्हायरल

- Advertisement -

फायटर प्लेनने चिनी गुप्तहेर बलूनला खाली पाडल्यानंतर काही वेळातच त्याचा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल होऊ लागला. वास्तविक, अमेरिकेने चिनी गुप्तहेराचा बलून पाडल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.


चीनचं स्पष्टीकरण

फुग्याच्या हा पर्यावरणविषयक संशोधन करण्यात येत असून तो चुकून अमेरिकेच्या हद्दीत गेला आहे, असं स्पष्टीकरण चीनकडून देण्यात आले आहे. परंतु, हा फुगा हेरगिरी करत असल्याचा दावा अमेरिकेतून करण्यात येतोय. त्यामुळे या दोन्ही देशातील संबंध पुन्हा एकदा बिघडण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -