घरदेश-विदेशआता तासाभरात बीजिंगवरून गाठणार येणार अमेरिका; चीन बनवतंय हायपरसॉनिक विमान

आता तासाभरात बीजिंगवरून गाठणार येणार अमेरिका; चीन बनवतंय हायपरसॉनिक विमान

Subscribe

या क्षेपणास्त्र इंजिनचे डिझाइन अमेरिकन अंतराळ संस्था नासाने नाकारले होते. नासाने यावर सांगितले की, त्याची किंमत खूप जास्त आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण करणाऱ्या चीनने अजून एक कमाल केली आहे. चीनमधील एका कंपनीने असे एक हायसॉनिक विमान तयार केले आहे ज्यामुळे तासाभरात बीजिंगवरून अमेरिका गाठणार येणार आहे. या हायपरसॉनिक विमानची आश्चर्याची गोष्ट म्हणजे 7,000 mph (11265 kmph) वेगाने उड्डाण करण्यासाठी त्याची डिझाइन विशिष्ट पद्धतीने केली आहे. या विमानाची चाचणी पुढील वर्षी सुरू होणार आहे. 2024 पर्यंत हे विमान हवेत उडण्यासाठी तयार होईल, अशी आशा शास्त्रज्ञांना आहे. हे विमान स्पेस ट्रान्सपोर्टेशन नावाची कंपनी तयार करत आहे.

द सनने Space.com च्या अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, हे भविष्यकालीन विमान एका स्पेस ट्रान्सपोर्टेशन कंपनीद्वारे विकसित केले जात आहे. दशकाच्या अखेरीस ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत उडण्यास सुरुवात करेल, असा विश्वास आहे. कंपनीने एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये रॉकेटच्या पंखांमधून उडणाऱ्या विमानाचे अॅनिमेशन पाहिले जाऊ शकते. टेकऑफनंतर, विमान रॉकेट-चालित विंग्सपासून वेगळे होतात आणि त्याच्या गंतव्यस्थानाकडे उड्डाण करते. यावेळी विंग आणि बूस्टर नंतर लॉन्च पॅडवर परत जातात.

- Advertisement -

कंपनीचा दावा आहे की, हे विमान केवळ एका तासात न्यूयॉर्कला चीनच्या राजधानीशी जोडण्यात सक्षम असेल. “आम्ही हाय-स्पीड, पॉइंट-टू-पॉइंट वाहतुकीसाठी ‘विंग्ड रॉकेट’ विकसित करत आहोत,” असे फर्मने चीनी मीडियाला सांगितले. हे विमान सॅटेलाईट वाहून नेणाऱ्या रॉकेटपेक्षा स्वस्त असेल आणि पारंपारिक विमानांपेक्षा वेगवान असेल.

हायपरसॉनिक विमान हे बोईंग 737 पेक्षा मोठे

हे हायपरसोनिक विमान चीनच्या हाय टेक योजनांचा मुख्य भाग आहे, कारण देशाने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पैसा आणि संसाधने गुंतवली आहेत. केवळ एका तासात पृथ्वीवर कुठेही 10 लोकांना घेऊन जाऊ शकणारे हे विमान तयार करण्याची योजना गेल्या वर्षी उशिरा सुरु झाली. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने वृत्त दिले आहे की, प्रस्तावित 148-फूट हायपरसोनिक विमान बोईंग 737 पेक्षा मोठे आहे आणि त्याच्या मुख्य भागावर दोन इंजिन बसवलेले आहेत.

- Advertisement -

चीन कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार 6,000 mph क्षमतेचे आण्विक क्षेपणास्त्र इंजिन विकसित करत आहे. या क्षेपणास्त्र इंजिनचे डिझाइन अमेरिकन अंतराळ संस्था नासाने नाकारले होते. नासाने यावर सांगितले की, त्याची किंमत खूप जास्त आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -