Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी आम्हाला शत्रू मानून अमेरिका करत आहे मोठी चूक, पुन्हा होऊ शकतो ९/११...

आम्हाला शत्रू मानून अमेरिका करत आहे मोठी चूक, पुन्हा होऊ शकतो ९/११ सारखा हल्ला; चीनी मीडियाचा इशारा

Related Story

- Advertisement -

चीनी सरकारी मीडिया ग्लोबल टाईम्सचे संपादक हू जिजिन यांनी ९/११ दहशतवादी हल्ल्याला २० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने एक मोठं वक्तव्य केलं आहे. जिजिन म्हणाले की, अमेरिका चीनला आपला शत्रू समजून खूप मोठी चूक करत आहे. जर अशाच प्रकारची वृत्ती अमेरिकेने ठेवली तर दहशतवादी याचा फायदा घेऊ शकतात आणि भविष्यात ९/११ सारखा दुसरा दहशतवादी हल्ला पुन्हा एकदा होऊ शकतो, असा इशारा चीनी मीडियातून देण्यात आला आहे.

पुढे जिजिन म्हणाले की, ११ सप्टेंबर झालेला हल्ला हा फक्त १९ दहशतवाद्यांनी केलेला आत्मघाती हल्ला होता. परंतु हा दहशवतादी गटाने केलेला आत्मघाती हल्ला नव्हता. सध्या अनेक दहशतवादी संघटना एकत्र येऊन अमेरिकावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे. अमेरिका चीनला आपला शत्रू समजून किती मोठी चूक करत आहे, हे वेळ आल्यावर समजेल.

- Advertisement -

सध्या चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध खूप बिघडले आहेत. शिनजियांगच्या उत्तर-पश्चिम क्षेत्रात मुस्लिम उईघुरांच्या दडपशाहीसाठी अमेरिकेच्या सहयोगीने बीजिंवर निर्बंध लादले आहेत.

दरम्यान ११ सप्टेंबर २००१ रोजी अल-कायदच्या १९ दहशतवाद्यांनी चार व्यावसायिक विमानांचे अपहरण केले होते. दोन विमानांच्या मदतीने न्यूयॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टॉवर्सवर हल्ला केला. तर दुसऱ्या विमानने पेंटागनच्या पश्चिमेला हल्ला केला. तसेच तिसरे विमान पेनसिल्व्हेनियामध्ये त्याचे लक्ष्य गाठण्यापूर्वीच कोसळले. या हल्ल्यात सुमारे तीन हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला.


- Advertisement -

हेही वाचा – Taliban: तालिबानने पहिल्यांदाच अमेरिकेतील ९/११च्या दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध


 

- Advertisement -