CoronaVirus: वुहान शहरात कोरोना रुग्ण; तब्बल १ कोटी जनतेची होणार चाचणी

wuhan coronavirus
वुहानमध्ये पुन्हा एकदा आढळले कोरोना बाधित रुग्ण

चीनमधील ज्या वुहान शहरातून कोरोना रुग्णांची सुरुवात झाली होती. मधल्या काळात हे वुहान शहर कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा वुहानमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून त्यामुळे तब्बल १ कोटी १० लाख जनतेच्या कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. वुहान शहरात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोरोना या जीवघेण्या विषाणूने प्रवेश केला होता. गेल्या आठवड्यात मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वुहानमध्ये आढळले आहेत. त्यामुळे मिळालेल्या अहवालानुसार शहरातील संपूर्ण एक कोटी १० लाख जनतेची कोरोना चाचणीचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा – १२ वर्षातील सर्वात कमी उष्णता; लॉकडाऊनसह ही आहेत तीन मुख्ये कारणे

३५ दिवसानंतर कोरोनाचा पुन्हा शिरकाव 

याबाबत चीनचे अधिकारी यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली की, एका समुहात सहा नवे कोरोना रुग्ण आढळले असून खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व लोकांची चाचणी येत्या १० दिवसांत घेण्यात येईल. कोरोनाच संसर्ग वुहानमध्ये वाढू नये म्हणून सरकारने ही उपाययोजना केली असल्याचेही त्यांनी सांगितले. वुहानमध्ये अँटी व्हायरस विभागामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार, वुहान हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांच्या चाचण्या इथे केल्या जात आहेत. या चाचण्या पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण होतील. हुबेई प्रांतातील सर्व जिल्ह्यात १० दिवसाच्या आता प्रत्येक नागरिकांची चाचणी करण्याची योजना आखण्यात आली आहे. वुहान शहरातील लॉकडाऊन ८ एप्रिल रोजी हटवण्यात आले होते. त्यानंतर ३५ दिवसांनी येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.