घरAssembly Battle 2022China Covid : चीनमध्ये संतापाचा उद्रेक! सरकार बॅकफूटवर, कोरोना नियमात केले बदल

China Covid : चीनमध्ये संतापाचा उद्रेक! सरकार बॅकफूटवर, कोरोना नियमात केले बदल

Subscribe

चीनमध्ये कोरोना महामारीने पुन्हा थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. यामुळे चीन सरकारने संपूर्ण देशात आता झिरो कोविड पॉलिसीची अतिशय कोटेकोरपणे अंमलात आणली आहे. मात्र त्याविरोधात आता देशात संपाताची लाट उसळली आहे. चीनच्या रस्त्यावर नागरिक तीव्र निदर्शने करत आहेत. त्यामुळे चीन सरकार आता बॅकफूटवर आले आहे. चीनी नागरिकांच्या विरोधापुढे आता चीन सरकारने नमते घेतले आहे.

चीन सरकारने आता झिरो कोविड पॉलिसीत मोठा बदल केला आहे. यामुळे चीनमधील नागरिकांना आता क्वारंटाईन आणि लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता देण्यात आली आहे. चीन सरकारच्या नव्या कोरोना पॉलिसीनुसार, जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर त्या व्यक्तीला क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही, त्याला फक्त घरीच क्वारंटाईन केले जाऊ शकते. ज्या लोकांना सौम्य किंवा कोणतीही लक्षणे नाहीत ते घरीच राहून उपचार करू शकतात.
याशिवाय सार्वजनिक ठिकाणी पीसीआर चाचणीची सक्तीही रद्द करण्यात आली आहे. पीसीआर चाचणी केवळ शाळा आणि रुग्णालयांमध्ये अनिवार्य असेल. गेल्या आठवड्याभरापासून चीनमध्ये सुरु असलेल्या आंदोलनानंतर चीन सरकार कडक कोरोना नियमांमध्ये बदल करत आहे.

- Advertisement -

जगातील इतर देशांप्रमाणेच आता चीनमधील नागरिकांनाही कोरोना व्हायरससोबत जगावे लागणार आहे. देशात दररोज 30 हजारांहून अधिक प्रकरणे समोर येत असताना चीन सरकारने ही पावले उचलली आहेत. चीनमध्ये आता रुग्णालये आणि शाळा वगळता बहुतांश सार्वजनिक ठिकाणी पीसीआर चाचणी अनिवार्य नसेल. तसेच मर्यादित भागातचं लॉकडाऊन लागू असेल. जसे की, कोरोनाबाधित रुग्ण असलेली इमारती, काही युनिट, काही मजले लॉकडाऊन केले जातील.यापूर्वी संपूर्ण शहर किंवा आसपासच्या भागात लॉकडाऊन केले जात होते.

कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्सनुसार, पाच दिवस उच्च जोखीम असलेल्या भागात कोणताही नवीन रुग्ण आढळला नाही तर तर निर्बंध उठवले जातील. तसेच शाळांमध्ये कोरोना बाधित मोठ्या प्रमाणात आढळून आले नाहीत, तर त्या शाळा उघडल्या जातील. तसेच इमारतींमधील इमर्जन्सी दरवाजे उघडून आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यात याव्यात.

- Advertisement -

आत्तापर्यंत चीनमध्ये कोविडबाधित रुग्णासह त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही क्वारंटाइन कॅम्पमध्ये जबरदस्तीने राहण्यास भाग पाडले जात होते. चीन सरकारच्या या कोरोनाविरोधी नियमांचा नागरिकांनी तीव्र निषेध केला. चीन आरोग्य यंत्रणा संक्रमित व्यक्तीला जबदरस्तीने घरातून बाहेर खेचत क्वारंटाईन सेंटरमध्ये नेत असल्याचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले. त्यामुळे आधीच कोरोनामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी नव्या लागू केलेल्या नियमांचा कडाडून विरोध केला.


सीमासंघर्ष थांबवण्यासाठी केंद्राने लक्ष घालावं; राज ठाकरेंचा बोम्मईंनाही इशारा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -