घरदेश-विदेशचीनमध्ये नव्या झुनोटिक लांग्या व्हायरसची दहशत; आतापर्यंत 35 रुग्णांची नोंद

चीनमध्ये नव्या झुनोटिक लांग्या व्हायरसची दहशत; आतापर्यंत 35 रुग्णांची नोंद

Subscribe

या 35 पैकी 26 रुग्णांमध्ये ताप, थकवा, खोकला, भूक न लागणे, स्नायू दुखी, डोकेदुखी आणि उलट्या यांसारखी लक्षण आढळली आहेत

जगभरात कोरोनाची दहशत संपत नाही तोवर आणखी एका नव्या व्हायरसने डोकं वर काढलं आहे. चीनमध्येचं या नव्या व्हायरसने हातपाय पसरले आहेत. तैवान सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये झुनोटिक लांग्या हा नवा व्हायरस आढळून आला आहे, ज्यात जवळपास 35 जणांना या नव्या व्हायरसची लागण झाली आहे. तैवान या व्हायरसचा संसर्ग ओळखण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी न्यूक्लिक अॅसिड चाचणी पद्धत सुरु केली आहे.

चीनच्या शेंडोंग आणि हेनान प्रांतात लांग्या हेनिपा व्हायरस आढळून आला आहे. हा व्हायरस प्राण्यांपासून मानवामध्ये पसरु शकतो. तैवानच्या सीडीसीचे उपमहासंचालक चुआंग झेन- हसियांग म्हणाले की, अभ्यासातून दिसून आले की, हा व्हायरस मानवातून मानवामध्ये पसरत नाही. त्यामुळे हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो असे म्हणू शकत नाही. परंतु या व्हायरसबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.

- Advertisement -

पाळी प्राण्यांवरील सर्वेक्षणाबाबत माहिती देताना ते म्हणाले की, आत्तापर्यंत शेळ्यांमध्ये 2 टक्के, कुत्र्यांमध्ये 5 टक्के प्रकरणे आढळून आली आहेत. 25 वन्य प्राण्यांच्या प्रजातींवर केलेल्य़ा चाचण्यांचे निष्कर्षांमध्ये दिसून आले की, उंदरासारख्या दिसणाऱ्या एका लहान कीटकभक्षी सस्तन प्राणी यातून लांग्या हेनिपा व्हायरस वेगाने पसरत आहे.

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसनच्या प्रदर्शित अहवालानुसार, चीनमध्ये एक नवीन हेनिपा व्हायरस आढळून आला आहे. ज्याची लागण झाल्यास मानवात तापाची लक्षणं दिसतात. चीनच्या शेनडोंग आणि हेनान प्रातांत लांग्या हेनिपाची लागण झालेले 35 रुग्ण आढळून आले आहेत. हे 35 रुग्ण एकमेकांच्या संपर्कातील नाही. तसेच या रुग्णांच्या कुटुंबियांना किंवा जवळच्या व्यक्तीला संसर्ग झालेला नाही.

- Advertisement -

या 35 पैकी 26 रुग्णांमध्ये ताप, थकवा, खोकला, भूक न लागणे, स्नायू दुखी, डोकेदुखी आणि उलट्या यांसारखी लक्षण आढळली आहेत. तर रुग्णांच्या शरीरातील पांढऱ्या पेशांमध्येही घट दिसून आली, इतकेच नाही प्लेटलेट्स कमी होणे, यकृत निकामी होणे, किडनी निकामी होणे यांसारखी लक्षणेही रुग्णांमध्ये आढळून आली आहेत.


भारताला मंकीपॉक्सचा धोका? टास्क फोर्स तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घेऊ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -