Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश China's New Map : भारताचा विकास पचनी पडत नाही, भाजपाची राहुल गांधींवर...

China’s New Map : भारताचा विकास पचनी पडत नाही, भाजपाची राहुल गांधींवर टीका

Subscribe

नवी दिल्ली : चीनने प्रसिद्ध केलेल्या एका नकशावरून राजकीय वाद रंगला आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. लडाखमध्ये एक इंचही जमीन गेली नाही असे पंतप्रधान खोटे बोलत आहेत, हे मी आधीच म्हणालो होतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तर, भाजपा नेते धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर पलटवार केला आहे.

- Advertisement -

चीनने नुकत्याच जाहीर केलेल्या अधिकृत नकाशात अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा भाग आपला असल्याचे दाखवल्यानंतर भारताने नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही चीनचा दावा फेटाळून लावला आहे. राहुल गांधी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, राहुल गांधी यांनी आपली मानसिक दिवाळखोरी वारंवार दाखवली आहे. भारताचा विकास त्यांच्या पचनी पडत नाही. त्यांची भूमिका नेहमीच ‘चीन समर्थक’ अशीच राहिली आहे. आज भारताचे नेतृत्व आणि त्याची संरक्षण शक्तीची जगभरात वेगळी ओळख आहे.

हेही वाचा – लडाखमधील चीनच्या घुसखोरीविषयी पंतप्रधान खोटे बोलतायत; राहुल गांधींची पुन्हा मोदींवर टीका

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी लडाख प्रकरणात खोटे बोलत आहेत, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, अलीकडेच चीनने एक वादग्रस्त नकाशा जारी केला होता, ज्यामध्ये अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन, तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीन समुद्राचाही उल्लेख करण्यात आला होता. भारत सरकारने चीनचा हा नकाशा नाकारला जरी असला तरी, याबाबत खरी माहिती मोदी का पुढे येऊ देत नाही, असाही सवालही त्यांनी केला.

भारतविरुद्ध चीनच्या कुरघोड्या सुरूच आहेत. ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या प्राकृतिक संसाधन मंत्रालयाच्या वेबसाइटवर मानक मानचिन्ह आणि चीनचा नकाशा दिसत आहे. भारतातील अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन या भागाला चीनमध्ये दाखवण्यात आले आहे.

हेही वाचा – आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे पण भाजपकडे कोण? उद्धव यांचा थेट सवाल

चीनकडून आधी देखील असाच नकाशा
याआधी देखील एप्रिल महिन्यात चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावे चिनी, तिबेटी आणि पिनयिन लिपीत प्रसिद्ध केली होती. यामध्ये दोन भूभागांची नावे, दोन निवासी क्षेत्रांची नावे, पाच पर्वतीय प्रदेशांची नावे आणि दोन नद्यांची नावे समाविष्ट होती. चीन सरकारच्या प्रांतीय परिषदेने या परिसराला जंगनन असे नाव ठेवून तो तिबेटच्या दक्षिणेकडील भाग असल्याचे म्हटले होते. त्यावेळी भारताने तीव्र आक्षेप घेत नावांच्या या याद्या फेटाळून लावल्या होत्या.

- Advertisment -