घरताज्या घडामोडीArunachal Pradesh : अरूणाचलच्या मुलाचे चीनच्या PLA कडून अपहरण, राहुल गांधी म्हणाले...

Arunachal Pradesh : अरूणाचलच्या मुलाचे चीनच्या PLA कडून अपहरण, राहुल गांधी म्हणाले…

Subscribe

भारत आणि चीनच्या सीमेवर लडाखनजीक सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यातच चीनकडून सातत्याने कारस्थान सुरूच आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) ने अरूणाचल प्रदेशच्या सीमेलगत एका १७ वर्षीय मुलाचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. खासदार तापिर गाओ यांनी ही माहिती केंद्र सरकारला कळवली आहे. केंद्र सरकारने गुरूवारी दिलेल्या स्पष्टीकरणात चीनच्या सैन्याला चौकशी करण्याचे आणि प्रोटोकॉलनुसार मुलाला देशात पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

संरक्षण मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार अरूणाचल प्रदेशच्या मिराम तरोनच्या बेपत्ता होण्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्यांने तत्काळ पीएलशी संपर्क साधला. पीएलएला या मुलाचा तपास करण्याचे तसेच एसटीडी प्रोटोकॉलनुसार त्याला परत सोपावण्याची विनंती भारतीय सैन्याने केला आहे. अरूणाचलच्या खासदार गाओ यांनी केलेल्या दाव्यानुसार या मुलाचे अपहरण अप्पर सियांग जिल्ह्यात बुधवारी करण्यात आले. पीएलएने आणखी एका मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता. पण तो मुलगा त्याठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी ठरला. या संपूर्ण प्रकरणाची माहिती गृह राज्यमंत्री नीतीश प्रमाणिक यांना तसेच सरकारी यंत्रणांनाही दिली असल्याचे गाओ यांनी सांगितले. याआधी २०२० मध्येही पाच जणांच्या अपहरणाचा प्रकार समोर आला होता. स्थानिक माध्यमांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर तत्कालीन गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी हे प्रकरण चीनसमोर ठेवला. त्यानंतर पाचही जणांची सुटका करण्यात आली होती.

- Advertisement -

कॉंग्रेसनेही या प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला आहे. कॉंग्रेसच्या राहुल गांधी ट्विट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आधीच एका मुलाचे चीनने अपहरण केले आहे. आम्ही मारीम तौरानच्या कुटुंबासोबत आहोत. आम्ही आशा सोडणार नाही, हार मानणार नाही. पंतप्रधानांचा अबोला हेच त्यांचे उत्तर आहे. त्यांना काहीही फरक पडत नाही, अशा भाषेत थेट पंतप्रधानांना टार्गेट करण्यात आले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -