नवी दिल्ली : भारतात जी 20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतात जी 20 ही शनिवार-रविवारी (९-१० सप्टेंबर) आयोजित करण्यात आली. या परिषदे निमित्ताने जगभरातील अनेक प्रमुख नेते भारतात येणार आहेत. यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे देखील अनुपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे.
चीन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्षांच्या अनुपस्थित शिखरी परिषदेवर काय परिणार होणार का?, यावर एस. जयशंकर म्हणाले, “मला वाटत नाही की, भारताला काही घेणे-देणे आहे. मला वाटते की, त्यांनी जो काही निर्णय घेतलाय, त्यासंदर्भात त्यांना चांगली माहिती असेल.” पुढे एस. जयशंकर म्हणाले, “व्लादिमिर पुतिन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी टेलीफोनवर बोलणे झाले आहे. त्यावेळी शिखर परिषदेत येणार नसल्याचे स्पष्टी केली आहे. या शिखर परिषदेत रशियाचे परराष्ट्रमंत्री येणार आहेत.”
जगमध्ये अनेक समस्या
एस. जयशंकर म्हणाले, “जगाला जी-20 या शिखर परिषदेकडून खूप आपेक्षा आहेत. जी – 20 मध्ये अनेक प्रकरणात आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहेत. मग तुम्ही आफ्रिकेत जा, लॅटिन अमेरिकेत, आशियाच्या काही भागात जा. कॅरिबियन किंवा पॅसिफिकमध्ये जा. आज प्रत्येकजण फक्त एकच गोष्ट म्हणत आहे की, आम्हाला समस्या आहेत. आम्हाला कर्जाच्या समस्या आहेत, व्यापार समस्या आहेत, आरोग्य समस्या, हरित विकास ही संसाधन समस्या आहेत. यामुळे जी-20 शिखर परिषदेत प्रत्येक देश आपल्यासाठी काय करतो, याची वाट बघत असते.
हेही वाचा – शी जिनपिंग यांची जी-२० शिखर परिषदेला बगल
जी – 20मधील बोलताना जयशंकर म्हणाले…
जी G-20 मध्ये अनेक मुद्दे आहेत आणि ग्लोबल साउथवर लक्ष केंद्रित करणे हा एक महत्त्वाचा संदेश आहे. एस. जयशंकर म्हणाले, “आपल्याला खरोखरच जगासमोर अनेक समस्या आहेत. पण त्यापैकी एक मोठा भाग ग्लोबल साउथमध्ये आहे, म्हणजे विकसनशील देशांमध्ये आहे. कोविडचा प्रभाव, युक्रेन युद्धाचा प्रभाव, कर्जासारखे मुद्दे जे बर्याच काळापासून आहेत.”