भारतात पुन्हा घुसखोरी करणार Tik-Tok! ‘या’ दोन कंपन्यांशी चर्चा सुरू

कंपनीचे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू...

केंद्र सरकारने बंदी घातलेल्या चायनीज मोबाईलमध्ये अग्रेसर असलेल्या टिक-टॉकला (TikTok) पुन्हा एकदा भारतात प्रवेश करायचा आहे. कंपनीचे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून त्यातच आता जपानी कंपनी सॉफ्टबँक टिक-टॉकची भारतातील मालमत्ता आणि व्यावसायिक हक्क खरेदीची तयारी करत आहे. कंपनीला या करिता एका भारतीय कंपनीची भागीदारी आवश्यक असून त्यादृष्टीने या कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. याआधी रिलायन्स जिओसोबत टिक-टॉकची बोलणी सुरू असल्याचे बोलले जात होते. पण आता यात आणखी एका कंपनीचे नाव जोडले गेले असून ही कंपनी म्हणजे भारती एअरटेल.

अमेरिकेतही टिकटॉकवर बंदीसाठी पाऊलं

टिकटॉक ही कंपनी चीनी सरकारबरोबर युझर्सचा डेटा शेअर करत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा आणि गोपनीयतेच्या कारणावरून टिकटॉकसह ५८ चिनी अॅप्सवर जुलैमध्ये केंद्र सरकारने बॅन केले होते. नंतर लगेचच अमेरिकेतही टिकटॉकवर बंदीसाठी पाऊलं उचलण्यात आली आणि तिथे देखील बर्‍याच टेक कंपन्याही त्यांचा व्यवसाय खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या कंपन्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

या कंपन्यांची भागीदारी करण्यास चर्चा सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, टिकटॉकची मुख्यकंपनी बाइटडान्समध्ये आधीपासूनच जपानी कंपनी सॉफ्टबँकची भागीदारी आहे. ब्लूमबर्गच्या मते, त्यांनी टिकटॉकचा देशातील व्यवसाय खरेदी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आणि रिलायन्स जिओ इन्फोकॉम आणि भारती एअरटेलसोबत भागीदारी करण्यासाठी देखील चर्चा सुरू आहे. मात्र, जिओ आणि भारती एअरटेलने यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे तर त्याचबरोबर सॉफ्टबँक देखील इतर पर्यायही शोधत आहे.

रिलायन्स भारतातील व्यवसाय खरेदी करणार?

जपानी कंपनी सॉफ्टबँकने ओला कॅब, स्नॅपडील, ओयो रूम्स सारख्या अनेक स्टार्टअप्समध्ये भारतात गुंतवणूक केली आहे. या दरम्यान ऑगस्टच्या सुरुवातीला अशी चर्चा देखील सुरू होती की, रिलायन्स टिकटॉकचा भारतातील व्यवसाय खरेदी करू शकेल. मात्र त्यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती बाहेर समोर आलेली नाही.


‘९ तारखेला मुंबईत येते, कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा’; कंगनानं दिलं Challenge