घरताज्या घडामोडीCorona: कोरोनामुळे पुन्हा चीनमध्ये पसरले भीतीचे वातावरण; परदेशी सामानाच्या खरेदीवर घातली बंदी,...

Corona: कोरोनामुळे पुन्हा चीनमध्ये पसरले भीतीचे वातावरण; परदेशी सामानाच्या खरेदीवर घातली बंदी, कुरिअर सेवाही बंद

Subscribe

चीनच्या सीमावर्ती शहर हिहे (Heihe)मधील काऊंटियों आणि इतर जिल्ह्यांनी म्हटले की, परदेशातील सामान खरेदीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. उत्तर चीनमधील इनर मंगोलिया स्वायत्त क्षेत्रातील एरेनहोट शहरातील रहिवाशांनी मंगोलियामधून खरेदी केलेल्या वस्तूंच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना केसेस आढळण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर बंदीचा हा निर्णय घेण्यात आला. अलीकडे एरेनहोटच्या पाच रहिवाशांनी शहराच्या महामारी प्रतिबंध आणि नियंत्रण टास्क फोर्सला कळवले की, त्यांनी मंगोलियाहून खरेदी केलेल्या वस्तू घेतल्या होत्या ज्याची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. याबाबतचे वृत्त चीनच्या सरकारी ग्लोबल टाईम्समध्ये देण्यात आले आहे.

माहितीनुसार, चीनमधील शहरांनी कुरिअर कंपन्यांना परदेशातून आधीच प्राप्त झालेल्या वस्तूंना सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ते कुरिअर एका विशेष ठिकाणी ठेवण्याचे आदेश देखील दिले आहेत. त्यानंतर स्थानिक महामारी प्रतिबंध आणि नियंत्रण अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्याची सूचना देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याला कोरोना प्रादुर्भाव पसरवण्यास जबाबदार ठरवले जाणार आहे.

- Advertisement -

ऐहुई जिल्ह्यातील कोरोनाच्या एका स्थानिक प्रकरणाबरोबर तीन प्रकरणांच्या अहवालानंतर हिहेने २८ ऑक्टोबरपर्यंत कडक लॉकडाऊन लावला होता. सध्या चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. आतापर्यंत २० प्रांतामधील ४४ शहरात कोरोना पुन्हा पाय पसरले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, चीनमध्ये आतापर्यंत ९७ हजार ८२३ एकूण कोरोनाबाधित आढळले असून यापैकी आतापर्यंत ४ हजार ६३६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९१ हजार ९८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – मलिकांना कायदेशीर उत्तर बहिणच देणार, प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे क्रांती रेडकरचे स्पष्टीकरण

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -