घरCORONA UPDATECoronaVirus: वुहान प्रयोग शाळेतील 'ती' महिला आता नव्या व्हायरसच्या शोधात

CoronaVirus: वुहान प्रयोग शाळेतील ‘ती’ महिला आता नव्या व्हायरसच्या शोधात

Subscribe

कोरोनाचा विषाणू चीनमधील वुहान शहराच्या प्रयोग शाळेतून जगभरात पसरला अशी चर्चा आता वारंवार होत आहे. मात्र त्याच प्रयोग शाळेत काम करणाऱ्या महिला शास्त्रज्ञावर हा व्हायरस बनवण्याचा गंभीर आरोप केला जात आहे. आतातर ही महिला आणखी एका नव्या व्हायरसच्या शोधात असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. वुहानच्या प्रयोग शाळेत संशोधन करणाऱ्या त्या महिला शास्त्रज्ञाने आधी तर चीनच्या सांगण्यावर कोरोना व्हायरसची निर्मिती केली, असे म्हटले जाते. तर आता नव्या व्हायरसचे संशोधन ती करत असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा – पाच राज्यात दारुची रेकॉर्ड ब्रेक विक्री; ५५४ कोटींची कमाई

- Advertisement -

चीनमधील महिला शास्त्रज्ञ शी झेंगली असे त्यांचे नाव असून यांना बॅटवूमन असेही संबोधले जाते. या शब्दाची फोड केल्यास बॅट म्हणजे वटवाघूळ आमि वुमन म्हणजे महिला त्यामुळे वटवाघुळापासून व्हायरस बनवणारी महिला, असे त्यांना म्हटले जात आहे. ही महिला गेल्या काही वर्षांपासून वुहानच्या पी ४ प्रयोग शाळेत वटवाघुळांमधून होणाऱ्या व्हायरसवर संशोधन करत आहे. मात्र चीनच्या गुप्तचर एजेंसीने या महिला शास्त्रज्ञाला आता दडवून ठेवल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनी शास्त्रज्ञ शी झेंगलीने फेब्रुवारीमध्ये कोरोना व्हायरसचा वुहानच्या प्रयोग शाळेशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र मार्चमध्ये त्यांची प्रतिक्रिया बदलली. त्यांनी हा व्हायरस याच प्रयोग शाळेतील बाहेर आल्याची शंका व्यक्त केली होती.

कोरोनावर अजून कोणतीही लस जगभरात बनली नसून सर्व देशातील शास्त्रज्ञ त्याची निर्मिती करण्यात गुंतले आहेत. कोरोनाचा हाहाकार दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी या विषाणुला आळा घालण्यासाठी लवकरात लवकर त्यावर लस शोधणे गरजेचे आहे. त्यातच आता शी झेंगली पुन्हा एकदा वुहानच्या पी ४ प्रयोग शाळेत दाखल झाल्याची माहिती येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -