घरदेश-विदेशचीनच्या डॉक्टरचा Covid-19 संदर्भात मोठा खुलासा! म्हणाले...

चीनच्या डॉक्टरचा Covid-19 संदर्भात मोठा खुलासा! म्हणाले…

Subscribe

हाँगकाँगच्या मायक्रोबायोलॉजी आणि मेडिसिनचे प्राध्यापक क्वोक-यंग युएन यांनी हे आरोप केले

चीनमध्ये कोरोना विषाणूची रूग्ण सर्वात प्रथम आढळून आलेल्या एका चिनी डॉक्टरने स्थानिक प्रशासनाचा आवाज दाबल्याचा आरोप केला. डॉक्टर म्हणाले की, कोरोना विषाणूचं केंद्रस्थान असलेल्या वुहानमध्ये कोरोना या महामारीला सुरुवातीपासूनच लपवण्यात आले होते आणि चौकशी करायला जाण्यापूर्वी त्याचे पुरावे देखील नष्ट करण्यात आले होते.

हाँगकाँगच्या मायक्रोबायोलॉजी आणि मेडिसिनचे प्राध्यापक क्वोक-यंग युएन यांनी हे आरोप केले. ते म्हणाले की, हुनान वन्यजीव बाजारातील पुरावे नष्ट करण्यात आले होते आणि वैद्यकीय निष्कर्षांना मिळणारा प्रतिसाद खूपच संथ आहे. युएनने चीनच्या वुहान शहरात कोविड -१९ महामारीच्या प्रादुर्भाव होण्याच्या तपासणीत मदत केली होती. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा आम्ही हुनानच्या सुपर मार्केटला गेलो होतो तेव्हा तेथे खरोखर काहीच दिसत नव्हते कारण बाजारपेठ आधीच स्वच्छ करण्यात आली होती. मानवांमध्ये या विषाणूमुळे उद्भवणारी कोणतीही लक्षणं आम्ही ओळखू शकली नाही.

- Advertisement -

त्यांनी असेही सांगितले की, मला वुहानमध्ये स्थानिक पातळीवरील प्रशासनावर शंका आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना ज्यांना त्वरित माहिती पुढे पाठवायची होती त्यांनी तातडीने पाठवली नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वुहानमधील हुनान वन्यजीव बाजारातून कोरोना विषाणूचा प्रसार झाला होता आणि आता तो जगभरात १.६ कोटी लोकांमध्ये पसरून त्याचा संसर्ग त्यांना झाला आहे. या संक्रमणामुळे, जगात ६ लाख ४८ हजारांपेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे चक्र देखील यामुळे थांबले आहे.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते चीनमध्ये कोविड -१९ चे अनेक रूग्ण आढळले आहेत. तर अमेरिकेसह अनेक देशांनी या रोगाच्या तीव्रतेबद्दल जगाला काही न सांगता चीनवर टीका केली. मात्र चीनने ही माहिती खरी असल्याचा आरोप नाकारला आहे.

- Advertisement -

या प्राणघातक विषाणूबद्दल वैद्यकीय कर्मचार्‍यांना इशारा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. ली वेनलियांग आणि इतर लोकांचा देखील छळ केल्याचा चीनवर आरोप आहे. ली ही अशी पहिली व्यक्ती होती जिने विषाणूबद्दल माहिती दिली. ते स्वत: देखील संक्रमित झाले होते आणि फेब्रुवारी महिन्यात त्याचा मृत्यू झाला आहे.


दोन आठवड्यांत कोरोनाच्या उपचारांबद्दल अमेरिका देणार Good News – ट्रम्प

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -