घरदेश-विदेशचिनी हॅकर्सचा आधारच्या डेटावर डोळा; अहवालातून धक्कादायक माहिती उघड

चिनी हॅकर्सचा आधारच्या डेटावर डोळा; अहवालातून धक्कादायक माहिती उघड

Subscribe

चीनी हॅकर्सनी आता भारतीय डेटा एजन्सी आणि मीडिया संस्थांना लक्ष्य केले असून भारतीयांच्या आधारवर त्यांचा डोळा आहे, असे सायबर सिक्युरिटी फर्म रेकॉर्ड फ्यूचर इंकच्या नवीन अहवालातून समोर आले आहे. तर चीनच्या हॅकर्सनी आधारची माहिती सुरक्षित ठेवणाऱ्या यूआयडीएआय (UIDAI) आणि देशातील एका प्रमुख माध्यम समूहाची माहिती चोरल्याची घटना देखील ब्लूमबर्गमध्ये प्रकाशित झालेल्या या अहवालातून उघड झाली आहे. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर UIDAI ने सायबर सुरक्षा कंपनीचा हवाला देत समोर आलेल्या अहवालाला नाकारले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ अब्जाहून अधिक भारतीय नागरिकांची खासगी माहिती बायोमेट्रिक पद्धतीने साठवण्यात आली आहे. या वर्षाच्या जून आणि जुलै दरम्यान यूआयडीएआयच्या नियमांचे उल्लघंन करत घुसखोरी केली असल्याचे UIDAI चे मत आहे. मात्र कोणतीही माहिती हस्तगत केली गेली हे स्पष्ट झालेलं नाही असे रेकॉर्ड फ्यूचरने अद्याप सांगितले आहे.

अशा हॅकर्सपासून भारतीयांचा डेटांचे संरक्षण व्हावे, यासाठी आधारची माहिती ही एन्क्रिप्ट केलेली आहे आणि अनेक स्तरांवर प्रमाणीकरणानंतरच त्यात प्रवेश दिला जाऊ शकतो, असे UIDAI ने म्हटले आहे. तसेच यापूर्वीही आधारची माहितीची चोरी झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्यानंतर सरकारकडून योग्य ती पावलं उचलण्यात आली होती. त्यांनतर सरकारकडे मजबूत सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आली आहे. ही माहिती सुरक्षित राहण्यासाठी सतत अपग्रेड केले जाते.

- Advertisement -

रेकॉर्ड फ्यूचरने दिलेल्या माहितीनुसार, चिनी हॅकर्सने बेनेट कोलमन अँड कंपनी, म्हणजेच टाइम्स ग्रुपला देखील लक्ष्य केले असल्याचे दिसून आले. फेब्रुवारी ते ऑगस्ट दरम्यान कंपनीमधून माहिती काढण्यात आली होती, पण माहितीची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले नसल्याचे सांगितले जात आहे. बोस्टनजवळील सायबरसुरक्षा फर्म रेकॉर्ड फ्यूचरने म्हटले आहे की, त्यांनी सरकारी संस्था आणि माध्यम समूहाचे सर्व्हर आणि मालवेअर वापरून हॅकर्सद्वारे वापरले जाणारे सर्व्हर यांच्यातील संशयास्पद नेटवर्कबाबत माहिती मिळवण्यासाठी एक प्रणाली विकसित केली. ज्यामुळे हॅकर्स त्यांच्या मागणीनुसार माहिती काढू शकतील.


भारतीय ‘Covishield’ लसीला ब्रिटनकडून मान्यता, नवीन गाईडलाईन्स जारी

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -