Corona Virus : कोविड-१९ च्या NeoCov या विषाणूबाबत चिनी वैज्ञानिकांचा इशारा, ३ रूग्णांपैकी एकाचा होऊ शकतो मृत्यू

संपूर्ण जगभरासह भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. भारतात दिवसागणिक लाखो रूग्ण कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. वुहानच्या वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरसच्या NeoCov या विषाणूबाबत इशारा दिला आहे. NeoCov विषाणू दक्षिण आफ्रिकेत आढळून आला आहे.

तीन रूग्णांपैकी एकाचा होऊ शकतो मृत्यू

वुहानच्या वैज्ञानिकांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, हा व्हायरस मोठ्या प्रमाणात घातक आहे. NeoCov च्या नव्या व्हेरियंटमुळे जर तीन रूग्ण संक्रमित झाले तर तीघांमधून एकाचा मृत्यू होऊ शकतो, असा इशारा वैज्ञानिकांकडून दिला जातो.

MERS-CoV शी कोविड-१९ च्या नव्या विषाणूचा संबंध

NeoCov हा विषाणू MERS-CoV शी जोललेला असा हा विषाणू आहे. २०१२ आणि २०१५ मध्ये पश्चिम आशियातील देशांमध्ये हा विषाणू पहिल्यांदा आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, NeoCov हा विषाणू नागरिकांना संक्रमित करीत नाहीये. परंतु दक्षिण आफ्रिकेत हा व्हायरस वटवाघुळ सारख्या पक्षामध्ये आढळून आला आहे. आतापर्यंत हा विषाणू फक्त प्राण्यांमध्येच दिसून आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, NeoCoV या विषाणूमुळे MERS प्रमाणेच अनेक रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो आणि ही संख्या ३ रुग्णांपैकी १ असू शकते.

SARS-CoV-2 तसेच जिनोम सिक्वेन्सिंगचा अभ्यास करणारी तज्ज्ञ समिती (INSACOG) ने नुकत्याच मांडलेल्या निष्कर्षानुसार भारतात तिसऱ्या लाटेअंतर्गत कोरोनाची महामारी ही कम्युनिटी ट्रान्समिशनच्या टप्प्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. ओमिक्रॉनचा स्ट्रेन हा देशातील अनेक मेट्रो शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात संक्रमण पसरवत असल्याचे तज्ज्ञ समितीने स्पष्ट केले आहे.


हेही वाचा : IND vs WI: अहमदाबादमध्ये तब्बल १० वर्षानंतर टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज आमनेसामने