घरदेश-विदेशदलाई लामा यांचा वाढदिवस साजरा केल्याने चीनची आगपाखड! सिंधु नदीवर फडकवले चीनी...

दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा केल्याने चीनची आगपाखड! सिंधु नदीवर फडकवले चीनी झेंडे

Subscribe

गेल्या काही महिन्यांपासून भारत- चीन सीमावाद अगदी डोकाला पोहचले आहेत. पाकिस्तानप्रमाणे चीनकडूनही भारतविरोधी कुरघोड्या सुरु आहेत. यात आता दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा केल्याने चीनची आगपाखड झाली आहे. चीनी सैन्याने एका सीमेवर पुन्हा एकदा आक्रमकता दाखण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने देमचुकमधील सिंधु नदीजवळ भारतविरोधी बॅनरबाजी करत चीनी झेंडे फडकावले आहेत. हा भाग भारताच्या लडाख प्रदेशात येतो. ही घटना ६ जुलैची असल्याचे सांगितले जात आहे. या भागातील काही बौद्ध धर्मीय नागरिक दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करत होते. यावेळी दलाई लामा यांच्या वाढदिवशी निषेध दर्शविण्यासाठी चिनी सैनिक लडाखजवळ सीमेवर दाखल झाले होते. चीनमधील काही लोक, पाच वाहने लाल काठ्यांसह लडाखच्या भागात घुसले.  या भागांत घुसल्यानंतर निषेधाचे फलक झळकावत होते.

गेली अनेक वर्षे दलाई लामा भारतात वास्तव्य करत आहेत. मात्र चीनने यावर अनेकदा आक्षेप घेतला. यात गेल्या आठवड्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दलाई लामा यांचे ८६ व्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देत अभिनंदन केले होते. तसेच दलाई लामा यांच्याशी प्रत्यक्षात बोलणे झाल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः दलाई लामा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे ट्विट केले होते.

- Advertisement -

६ जुलै रोजी तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा केला जातो. मात्र जो चीनला अजिबात पसंत नव्हता. याच्या निषेधार्थ देमचुकम येथील सिंधू नदीजवळ चीनच्या वाहनांनी घुसघोरी करत भारतविरोधी बॅनर आणि चिनी झेंडे फडकवण्यास सुरुवात केली. चिनी सैनिक ज्या ठिकाणी उभे होते आणि निदर्शने करीत होते ती जागा म्हणजे भारताची भूमी होती. मात्र, अद्याप या संपूर्ण प्रकरणावर भारतीय लष्कराकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

याच तिबेट सरकारकडून लवकरचं दलाई लामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र कोरोनामुळे ही भेट अद्याप होऊ शकली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दलाई लामा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत चीनला एकप्रकारे डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे मात्र चीनमधील कम्युनिस्ट पार्टीला नुकतीच १०० वर्षे झाली, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यामुळे चीनची अधिकचं आग होत आहे.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -