घरदेश-विदेशचीन पुरस्कृत हॅकर्सनी लडाखजवळील भारतीय वीज केंद्रांना केले लक्ष्य

चीन पुरस्कृत हॅकर्सनी लडाखजवळील भारतीय वीज केंद्रांना केले लक्ष्य

Subscribe

विशेष म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि नुकतेच भारत दौऱ्यावर आलेले चीनचे परराष्ट्र मंत्री यांनी लडाखमधील अडथळे आणि युक्रेन वादाच्या भौगोलिक राजकीय परिणामांवर चर्चा केली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांचीही भेट घेतली. दोन्ही देशांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली.

नवी दिल्ली: चिनी पुरस्कृत हॅकर्सनी लडाखजवळील भारतीय वीज केंद्रांना लक्ष्य केल्याची माहिती मिळत आहे. खासगी गुप्तचर संस्था रेकॉर्डेड फ्यूचरच्या अहवालात बुधवारी ही बाब उघड करण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, अलिकडच्या काही महिन्यांत किमान सात भारतीय राज्य लोड डिस्पॅच सेंटर्स (SLDCs) च्या संभाव्य नेटवर्कला लक्ष्य करून घुसखोरीच्या शक्यतेची चाचपणी केली आहे. हे ग्रिड कंट्रोल आणि पॉवर डिस्पेन्शनसाठी रिअल टाइम ऑपरेशनसाठी जबाबदार आहेत.

विशेष म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि नुकतेच भारत दौऱ्यावर आलेले चीनचे परराष्ट्र मंत्री यांनी लडाखमधील अडथळे आणि युक्रेन वादाच्या भौगोलिक राजकीय परिणामांवर चर्चा केली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांचीही भेट घेतली. दोन्ही देशांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये लडाखमधील उर्वरित भागातील वाद सोडवण्यावर आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी उर्वरित काम पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

- Advertisement -

विशेष म्हणजे चिनी हॅकर्स उत्तर भारतामधील विजेचे भारनियमन करणाऱ्या ७ केंद्रांवर लक्ष ठेवून आहेत. या भारनियमन केंद्रांच्या माध्यमातून भारत-चीन सीमेनजीकच्या परिसरातील विद्युत जनित्रांचे नियमन आणि वीज वितरण केले जाते. यापैकी एका केंद्रावर चीनमधील हॅकर्सनी यापूर्वीही सायबर हल्ला केला होता. पॉवर ग्रीडवरील या हल्ल्यांच्या माध्यमातून चीन गुप्त माहिती जमवत असल्याचे अहवालात म्हटले आहे. या सायबर हल्ल्यांसाठी यापूर्वी चिनी लष्कराकडून वापरण्यात येणारे शॅडोपॅड हे सॉफ्टवेअर वापरले जात आहे. या माध्यमातून चीनकडून संबंधित परिसरातील गुप्त माहिती जमवण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले जाते.


हेही वाचाः 

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -