दुसऱ्यांची घरं तोडणाऱ्यांच्याच घरात आज फूट, चिराग पासवान यांची टीका

महाराष्ट्रानंतर आता बिहारच्या राजकारणात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपची साथ सोडणार असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे.

लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार चिराग पासवान यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलंय. ज्यांनी दुसऱ्यांची घरं फोडली. त्यांच्याच घरात आता फूट पडलीय, असं चिराग पासवान म्हणाले. बिहारच्या राजकारणात वारंवार बदल होत असतात. सत्तेत आलेलं सरकार स्थिर होईपर्यंत सरकार कोसळतं!, हा इतिहास आहे. याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि जेडीयूची युती तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नितीश कुमार लवकरच आरजेडी आणि काँग्रेससोबत जाणार असून त्यांच्यासोबत आघाडी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रामविलास पासवान आजारी असताना आणि त्यांच्या जाण्यानंतर पक्षाची धुरा चिराग पासवान यांच्या खांद्यावर आली.

भाजपसोबत युतीत असणाऱ्या एलजेपीला डावललं गेल्याचा आरोप चिराग पासवान यांच्याकडून करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या या वागण्याला नितीश कुमार जबाबदार असून जेडीयूचा हात असल्याचं सांगितलं जात आहे.

नितीश कुमार मुख्यमंत्री राहतील की नाही, याची जनतेला पर्वा नाही, असे चिराग म्हणाले. बिहारमध्ये ते मुख्यमंत्री राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती होतील, एवढीच चर्चा सुरू आहे. बिहारच्या चिंतेची आणि सार्वजनिक मुद्द्याबद्दल कोणतीही चिंता नाही. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हा त्यांनी ठरवले होते का?, की ते मुख्यमंत्री कसे राहतील आणि यावरच काम करायचे? दिवा मॉडेल विकासाचे आहे. बिहारमधील 32 लाख लोकांनी चिराग मॉडेलला पाठिंबा दिला आहे.


हेही वाचा : नायडूंनी सर्व भूमिका चोख बजावल्या, त्यांच्यासोबत कामाची संधी मिळाली हे माझे सौभाग्य ; पंतप्रधान मोदींकडून कौतुक