चिराग पासवान यांना लोकजनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं, सुरजभान सिंह यांना दिली जबाबदारी

पक्ष जोडून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केला परंतु अपयशी ठरलो - चिराग पासवान

Chirag Paswan removed from Lok Janshakti party chairmanship, Surajbhan Singh given responsibility
चिराग पासवान यांना लोकजनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं, सुरजभान सिंह यांना दिली जबाबदारी

चिराग पासवान यांचे काका पशुपतीकुमार पारस यांच्या नेतृत्वात ५ खासदारांनी बंड करुन चिराग पासवान यांना गटनेतेपदावरुन हटवले होते. पशुपतीकुमार पारस यांनी घेतलेल्या तातडीच्या बैठकीत चिराग पासवान यांना लोकजनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदावरुन देखील हटवले आहे. सध्या सुरजभान सिंह यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून पक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. चिराग पासवाना यांना पक्षातून हटवल्यानंतर विरोधी पक्षांनी आता ऑफर देण्याची सुरुवात केली असून तशी फिल्डिंगही लावली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. चिराग पासवान यांना अध्यक्षपदावरुन हटवल्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळणार का? अशीही चर्चा सुरु आहे.

लोकजनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदावरुन चिराग पासवान यांना हटवण्यात आले आहे. ५ खासदारांनी बंड करुन चिराग पासवान यांना पक्षातून हटवण्यात आले आहे. तसेच लोकसभेत वेगळा गट स्थापित करुन लोकसभा गटनेतेपदावरुनही चिराग पासवान यांना हटवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार चिराग यांना लोकजनशक्ती पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांतून कार्यमुक्त केलं जाणार असल्याचे म्हटलं जात आहे. चिराग पासवान यांचे वडील राम विलास पासवान यांच्या निधनानंतर चिराग पासवान यांनी पक्षाची जबाबदारी स्विकारली होती.

लोकजनशक्ती पक्षाच्या कार्यकारणीची बैठकीत नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत सूरज भान यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच लोकजनशक्ती पक्ष पशुपती कुमार पारस ताब्या घेणार असून याची प्रक्रिया आठवड्याभरात पुर्ण होण्याची शक्यता आहे. लोकजनशक्ती पक्षाचे ६ आमदार असून पाच आमदारांनी बंड केलं आहे. यातील सहावे खासदार चिराग पासवान आहेत.

काकांना भेटण्यासाठी ४५ मिनीट वाट पाहिली

चिराग पासवान यांनी आपले काका पशुपतीकुमार पारस यांना भेटण्याची विनंती केली होती. घराच्या बाहेर ४५ मिनिट थांबूनही पशुपती कुमार यांनी भेट दिली नाही. चिराग पासवान यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन चूक केली आहे. यामुळे कार्यकर्ते नाराज झाले असल्याचे पशुपती कुमार यांनी म्हटलं आहे.

पक्ष जोडण्यात अपयशी ठरलो – चिराग पासवान

चिराग पासवान यांनी म्हटलं आहे की, पक्ष जोडून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केला परंतु अपयशी ठरलो आहे. पक्ष आपल्या मातेसमान असून पक्षासोबत कधीही विश्वासघात केला नाही पाहिजे. लोकशाहीमध्ये लोक सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत. पक्षावर विश्वास दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानत चिराग पासवान यांनी राजीनामा दिला आहे.

बिहारमधील विधानभा निवडणूकीत एलजेपी २४३ जागांपैकी केवळ १ जागा जिंकली होती. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला ३१ जागा मिळाल्या होता. एनडीएमधून बाहेर पडल्यामुळे चिराग पासवान यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला तर नितीश कुमार यांनाही घाटा झाल्याची निदर्शनास आले होते. यामुळे भाजप प्रमुख पक्ष ठरला आहे. यामध्ये बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, चिराग यांना भाजप आणि एनडीएशी काहीही फरक पडत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार जेडीयूचे ज्येष्ठ नेते लल्लन सिंग आणि भाजप खासदार यांनी पशुपतीकुमार पारस यांना सांगितले होते की, जर चिराग पासवान यांना प्रवाहातून दूर केलं तर ते बिहार एनडीए आणि केंद्रात नेते बनू शकतात.