जयपूर: राजस्थानमध्ये, मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजनेअंतर्गत, आरोग्य विमा संरक्षण आता 25 लाख रुपयांऐवजी 50 लाखांपर्यंत मोफत उपलब्ध होणार आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. (Chiranjeevi Yojana Free health insurance up to 50 lakhs now in Rajasthan Information given by Rahul Gandhi)
राहुल गांधी यांनी ट्विट केले की, “मी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना सांगितले की, राजस्थानच्या क्रांतिकारी चिरंजीवी योजनेंतर्गत मोफत उपचाराची रक्कम 25 लाख रुपये करण्यात यावी. आज, ₹50 लाख किमतीच्या मोफत उपचारांसह, भारतातील सर्वात मोठी आरोग्य संरक्षण योजना बनण्यासाठी तिचा विस्तार करण्यात आला आहे. आता, राजस्थानातील कोणत्याही गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबाला अत्यंत गंभीर उपचारांसाठी आपले घर विकावे लागणार नाही, कर्ज घ्यावे लागणार नाही किंवा दागिने गहाण ठेवावे लागणार नाही. ही काँग्रेसची हमी आहे, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.
मैंने मुख्यमंत्री अशोक गहलोत जी से कहा, राजस्थान की क्रांतिकारी चिरंजीवी योजना में ₹25 लाख तक के मुफ़्त इलाज की राशि और बढ़ा देनी चाहिए।
आज, इसे बढ़ा कर ₹50 लाख के मुफ्त इलाज की, भारत की सबसे बड़ी स्वास्थ्य सुरक्षा योजना बना दिया गया।
अब, राजस्थान में किसी गरीब या मध्यमवर्गीय…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 21, 2023
काय आहे चिरंजीवी योजना
चिरंजीवी आरोग्य विमा योजना मे 2021 मध्ये सुरू करण्यात आली. या अंतर्गत वैद्यकीय चाचणी कव्हरेज आणि मोफत उपचार सुविधा पुरवल्या जातात.
या योजनेंतर्गत राजस्थानमधील कायमस्वरूपी रहिवाशांनाच लाभ दिला जातो. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना त्याचा लाभ मिळतो. तसेच वर्षाला 850 रुपये जमा करावे लागतील.
चिरंजीवी आरोग्य विमा योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करता येतो. यासाठी तुम्हाला chiranjeevi.rajasthan.gov.in वर जावे लागेल. येथे जाऊन तुम्ही आवश्यक माहितीसह नोंदणी करू शकता.
(हेही वाचा Arvind Kejriwal : राष्ट्रीय प्रकल्पग्रस्त अन् जाहिरातबाजीवरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले)