घरदेश-विदेशकाँग्रेसच्या हिंदूविरोधी मानसिकतेची लक्तरे... आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या दाव्यावर चित्रा वाघांची प्रतिक्रिया

काँग्रेसच्या हिंदूविरोधी मानसिकतेची लक्तरे… आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या दाव्यावर चित्रा वाघांची प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : काँग्रेसमध्ये असे काही नेते आहेत, जे केवळ राम मंदिराचाच नव्हे तर, रामाचाही तिरस्कार करतात, असा धक्कादायक दावा पक्षाचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केला आहे. याच अनुषंगाने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करताना, प्रभू श्रीराम काँग्रेस नेत्यांच्या हृदयात का नाही? असा सवाल केला आहे.

हेही वाचा – काँग्रेसमध्ये रामाचाही तिरस्कार करणारे नेते, आचार्य प्रमोद कृष्णम यांचा घरचा अहेर

- Advertisement -

काँग्रेसमध्ये असे काही नेते आहेत जे केवळ राम मंदिराचाच नव्हे तर रामाचाही तिरस्कार करतात. या नेत्यांना ‘हिंदू’ शब्दाबद्दलही घृणा आहे. ते हिंदू धर्मगुरूंचा अपमान करू पाहतात. पक्षात कोणी हिंदू धर्मगुरू आहे, हे त्यांना पटत नाही, असे सांगून आचार्य प्रमोद कृष्णम यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना काँग्रेस नेत्यांना घरचा अहेर दिला आहे. या मुलाखतीदरम्यान आचार्य प्रमोद कृष्णम यांनी उघडपणे कोणाचेही नाव घेतले नाही, परंतु ते वारंवार ‘ते’ हा शब्द वापरत होते. याबाबत आचार्य यांना प्रश्न विचारला असता त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींवर निशाणा साधला.

- Advertisement -

याच अनुषंगाने भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस पक्षाचे हिंदूविरोधी चरित्र त्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी उलगडून दाखवले आहे. समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम यांचा द्वेष करणारे करंटे या पक्षात भरले आहेत, असे आचार्यांनी सांगितल्याचे चित्रा वाघ यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा – रोहित शर्मा नाकारत होता कर्णधारपद पण…; गांगुलीने सांगितली ‘ती’ इनसाइड स्टोरी

आम्हीही पहिल्यापासून काँग्रेसच्या याच हिंदूद्वेषी मानसिकतेवर टीका करत आलो आहोत. आता तर आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानेच काँग्रेसच्या हिंदूविरोधी मानसिकतेची लक्तरे भर वेशीवर टांगली आहेत. आखिर जो भगवान श्रीराम सब हिंदुओं के दिल में बसते हैं, वो काँग्रेस के मन में क्यों नहीं हैं? असा सवालही त्यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -