नायजेरियातील चर्चवर अज्ञातांकडून हल्ला; ५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू

नायजेरीयातमध्ये (Nigeria) असलेल्या एका चर्चवर (Chruch) अज्ञातांकडून झालेल्या हल्ल्यात ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी ख्रिस्चन मास प्रार्थना सुरू असताना अचानक अज्ञातांकडून हा हल्ला करण्यात आला.

टिकटॉकचा व्हिडिओ करणं पडलं महागात, मित्रावरच झाडली खरी गोळी

नायजेरीयातमध्ये (Nigeria) असलेल्या एका चर्चवर (Chruch) अज्ञातांकडून झालेल्या हल्ल्यात ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी ख्रिस्चन मास प्रार्थना सुरू असताना अचानक अज्ञातांकडून हा हल्ला करण्यात आला. रविवारी मास प्रार्थना सुरू असताना हा हल्ला झाला असून, या हल्ल्यात लहान मुलांसह महिलांना आपला जीव गमवावा लागला. अचानाक झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण नायजेरीयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नायजेरीयात ओंडो नावाचे राज्य असून, या राज्यातील ओवो शहरात रविवारी सकाळी हा हल्ला झाला. रविवारी सकाळी अज्ञातांनी चर्चवर गोळीबार केला. चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना सुरू असताना हा हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. हल्ला करण्यासाठी स्फोट करण्यात आला असून, अंदाधुंद गोळीबार करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ५० हून अधिक जणांनी आपला जीव गमवला आहे. मात्र मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या हल्ल्याची औंडू राज्याच्या सरकारकडूनही या हल्ल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

दरम्यान, हा हल्ला कोणी केला याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे सध्या पोलिसांकडून या हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.


हेही वाचा – Jan Samarth Portal launch: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘जन समर्थ’ पोर्टल लाँच करणार, कॉमन प्लॅटफॉर्मवर मिळणार अनेक सुविधा