धक्कादायक! ‘या’ राज्यातील सर्वाधिक मुली ओढतात सिगारेट

cigarette and bidi smoking among girls increased in madhya pradesh

राज्यातील दारूबंदी आणि नशेखोरीच्या विरोधात मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी आवाज उठवला आहे. याबाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, मध्यप्रदेशमध्ये मुलींचे सिगारेट आणि बिडी ओढण्याचं प्रमाण वाढले आहे. देशाच्या तुलनेत एका राज्याची ही आकडेवारी सर्वांनात चक्रावणारी आहे.

ग्लोबल यूथ टोबॅकोने याबाबत सर्व्हे केला आहे. शनिवारी भोपाळमध्ये उमंग स्कूल हेल्थ अँड वेलनेस कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रभूराम चौधरी उपस्थित होते.

या सर्व्हेनुसार, मध्य प्रदेशात सरासरी सात वर्षांच्या वयात मुली सिगारेट ओढण्यास शिकतात. मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण चिंताजनक आहे. 2.10 टक्के मुली तर 2.40 टक्के मुलं सिगारेट पितात. यात 13 ते 15 वयोगटातील मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे.

देशातील सरासरी 11.5 वर्षांची मुलं सिगारेट ओढतात. या तुलनेत मध्य प्रदेशची सरासरी 8.5 वर्षे इतकी आहे. फक्त मुलींचा विचार केल्यास देशात सरासरी 9.3 वर्षातील मुली सिगारेट ओढण्यास सुरुवात करतात. तर मध्यप्रदेशात सात वर्षांपासूनच मुली बिडी आणि सिगारेट ओढण्यास सुरुवात करतात. मध्य प्रदेशातील ही धक्कादायक आकडेवारी आहे.


मुलांना संस्कार देण्यात माझा भाऊ कमी पडलाय, सुषमा अंधारेंची राणेंवर टीका