कोरोना टेस्ट करणे झाले सोप्पे, बाजारात उपलब्ध झालेय ‘वीराजेन’ टेस्टिंग किट

Cipla's RT-PCR test kit 'ViraGen' to be sold from today
कोरोना टेस्ट करणे झाले सोप्पे, बाजारात उपलब्ध झालेय 'वीराजेन' टेस्टिंग किट

देशाभोवती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा अधिक घट्ट होत आहे. दररोज लाखो नवे कोरोनाबाधित रुग्ण देशात आढळत आहेत, या वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे सर्वाधिक नागरिकांचा कोरोना टेस्ट करण्यासाठी वेळ लागत आहे. परंतु ही अडचण आता लवकरचं संपणार आहे. कारण फार्मास्युटिकल कंपनी सिप्लाने गेल्या आठवड्यात लॉन्च केलेली कोरोना टेस्ट किट आज बाजारात उपलब्ध केली आहे. याआरटी-पीसाआर टेस्ट किटला ‘वीराजेन’ असे नाव देण्यात आले आहे. या टेस्ट किटला यूबिओ बायोटेक्नोलॉजी सिस्टम्ससह तयार करण्यात आले आहे. यावर बोलताना सिप्ला कंपनीने सांगितले की, या टेस्टिंग किटमुळे सध्या उपलब्ध टेस्टिंग सेवा आणि क्षमता वाढवण्यात मदत होईल.

ICMR ने दिली परवानगी

या कोरोना डिटेक्शन किटला इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नेही मान्यता दिली आहे. या किटमध्ये मल्टीप्लेक्श पीसीआर यंत्रणेचा उपयोग करण्यात आला आहे. बायोस्पेक्ट्रम मॅग्जीन वेबसाईटनुसार, हे किट ICMR टेस्टच्या तुलनेत ९८.६ टक्के संवेदनशीलता आणि ९८.८ टक्के वैशिष्टतेसह SARS CoV-2 N जनुक आणि ORF लॅब जनुक शोधण्यात मदत करते.

सिप्लाच्या म्हणण्यानुसार, ” कोरोना संशयित व्यक्तींच्या वरच्या आणि खालच्या श्वसनाच्या नमुन्यांमधील SARS-CoV-2 च्या न्यूक्लिक अॅसिडमधील गुणात्मक शोधण्यासाठी हे किट तयार केल गेले आहे. कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत कंपनीच्या योगदानाचे कौतुक करत सिप्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमंग वोहरा यांनी सांगितले की, युबायो बायोटेक्नॉलॉजी सिस्टम्सबरोबर या कंपनीची भागीदारी अधिकाधिक लोकांपर्यंत किट पोहोचण्यास मदत करेल. तसेच कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात यशस्वी उपचार पद्धती शोधण्यासाठी सिप्ला प्रयत्न करत आहे

‘वीराजेन’ हे सिप्लाचे तिसरे कोरोना चाचणी किट आहे. कंपनीने डिसेंबर २०२० मध्ये ‘CIPtest’ रॅपिड अँटीजन टेस्ट लॉन्च केले होते. तर त्यापूर्वी कंपनीने ‘एलिफास्ट: SARS CoV-2 IgG ELISA’टेस्ट किट लाँच केले होते.


Mount Everest : पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांचे गृहमंत्र्यांकडून कौतुक