CISCE Term 1 Result 2021: ICSE आणि ISC च्या टर्म 1 परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा रिझल्ट

cisce term 1 result 2021 cisce announces first term board exam results for classes 10 12

काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट (CISCE) च्या माध्यमातून ICSE टर्म 1 आणि ISC टर्म 1 या दोन्ही परीक्षांचा निकाल नियोजित वेळेत म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता जाहीर केला आहे. यामुळे दहावी आणि बारावीचे जे विद्यार्थी टर्म 1 च्या परीक्षेत बसले होते ते कौन्सिलच्या अधिकृत वेबसाइट cisce.org वर त्यांचा निकाल पाहू शकतात. यासोबतच विद्यार्थींना SMS द्वारेही निकाल पाहता येईल. रिझल्ट पेजवर विद्यार्थ्यांना त्यांचा युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि इतर माहिती भरून सबमिट करावे लागेल.

अशाप्रकारे पाहा ऑनलाईन आणि SMS द्वारे निकाल

CISCE द्वारे जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, ICSE टर्म 1 निकाल 2021 आणि ISC टर्म 1 निकाल 2021 परिषदेच्या अधिकृत वेबसाइट cisce.org वर घोषित केले जातील. या वेबसाइटवर निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे स्कोअर कार्ड पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचा युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि इतर तपशील भरून सबमिट करावा लागेल. यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल स्क्रीनवर पाहता येईल आणि दिलेल्या लिंकद्वारे सॉफ्ट कॉपी डाउनलोड किंवा प्रिंटही करता येईल.

याशिवाय CISCE ने CISCE टर्म 1चा निकाल SMS द्वारे पाहण्याची व्यवस्था देखील तयार केली आहे. ICSE टर्म 1 निकाल 2021 पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना मोबाइल मेसेजमध्ये ICSE<space><unique id> टाइप करावे लागेल आणि जारी केलेल्या 09248082883 मोबाइल क्रमांकावर पाठवावे लागेल. त्याचप्रमाणे ISC टर्म 1 चा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना ISC<space><Unique ID> टाइप करावे लागेल आणि 09248082883 या मोबाइल क्रमांकावर पाठवावे लागेल. यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर SMS द्वारे विविध विषयांसाठी टर्म 1 च्या परीक्षेचा निकाल पाहता येईल.

CISCE टर्म 1 निकाल 2021 पुन्हा तपासण्याची मुभा

ICSE टर्म 1 आणि ISC टर्म 1 चा निकाल CISCE च्या वेबसाईटवर जाहीर झाला. इयत्ता 10 वी आणि 12वी टर्म परीक्षांच्या निकालांनुसार, परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची डिजिटल मार्कशीट कौन्सिलद्वारे केली जाईल. ज्याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण ऑनलाइन तपासता येणार आहेत. विद्यार्थी कोणत्याही विषयाच्या गुणांबाबत असमाधानी असतील तर त्यांना त्यांची कॉपी पुन्हा तपासण्याचा पर्याय मिळेल. प्रत्येक विषयासाठी 1000 रुपये शुल्क भरून विद्यार्थी पुनर्तपासणीसाठी अर्ज करू शकतील.

ऑनलाईन रिझल्ट पाहण्यासाठी लिंक 

https://cisce.org/


धर्म संसदेतून निघालेल्या गोष्टी हिंदुत्वाच्या व्याख्येत बसत नाहीत, मोहन भागवतांचा टोला